काकडे महाविद्यालयात शासकीय सहकार व लेखा पदविका (G.D.C.&A. कार्यशाळा संपन्न

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----


येथील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयात वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी G.D.C.&A (Government Diploma in Co-operation and Accountancy) या विषयावर कार्यशाळा ऑनलाईन आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे सचिव प्रा. जयवंतराव घोरपडे यांनी केले. या प्रसंगी अध्यक्षस्थानी प्राचार्य जवाहर चौधरी होते. उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे सचिव प्रा. जयवंतराव घोरपडे यांनी G.D.C.&A चे महत्व पटवून दिले. त्यांनी सध्याच्या परिस्थितीमध्ये वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी या सारख्या शिक्षणाचे महत्त्व अधिक आहे असे सांगितले. तसेच या परिक्षेशिवाय सहकार विभागामध्ये, पतसंस्था, बँका, वित्तीय संस्था या मध्ये काम करण्याची संधी मिळू शकते हे सांगितले. 
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य जवाहर चौधरी यांनी वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता व्यवसायाभिमुख शिक्षण आणि स्वयंरोजगार याकडे वळावे असे प्रतिपादन केले. सद्यस्थितीमध्ये शासकीय आणि निमशासकीय सेवेमध्ये जाताना तसेच सहकार विभागामध्ये अशा परीक्षांना अधिक महत्त्व असेही सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हि अनमोल संधी आहे कारण हे विद्यार्थी शहरात जाऊन महागडे क्लास लावू शकत नाही या हेतूने महाविद्यालयात चालू शैक्षणिक वर्ष पासून नियमितपणे मोफत  G.D.C.& A या वर्गाचे नियमित मार्गदर्शन केले जाणार असून त्यासाठी समन्वयक म्हणून प्रा. पी.टी. जाधव हे काम पाहणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. पी. टी. जाधव यांनी केले त्यांनी या कोर्सची रूपरेषा, महत्व, आणि उद्देश स्पष्ट केला. शेवटी आभार प्रदर्शन उपप्राचार्य प्रा. आर. डी.गायकवाड यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे सहसचिव श्री. सतीश लकडे,  उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे, IQAC Co-ordinator डॉ. संजू जाधव, उपप्राचार्य डॉ. प्रवीण ताटे-देशमुख, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.राहुल खरात तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
To Top