बेकायदा जमाव जमवून कुटुंबातील लोकांना मारहाण : पणदरेतील पाच जणांवर गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 

पणदरे ता बारामती येथील गीतानगर भागात दुकानात आत आलेच्या कारणावरून विचारणा केली असता आरोपींकडून कुटुंबातील लोकांना मारहाण केल्या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांत पाच जनांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 
         सुनिल अशोक काबळे वय-४४ वर्ष व्यवसाय मजुरी रा.-पणदरे गीतानगर ता-बारामती यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याबाबत पोलिसांनी सुरज बापुराव लोंडे, बापुराव लक्ष्मण लोंडे, पार्वती पाबुराव लोंडे, लीलाबाई महादेव सोनवने, पुजा बापुराव लोंडे सर्व रा. गीतानगर ,पणदारे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये फिर्यादीचे वडील सुनिल अशोक काबंळे हे जखमी झाले आहेत.  
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  फिर्यादीची बहीण सारीका त्याचे किराणा दुकानात असताना यातील आरोपी नंबर १ याने  दुकाना मध्ये अनाधिकृत प्रवेश केल्याने फिर्यादीची बहीण सारीका यांनी त्यास तु दुकाणात आत मध्ये कसा काय आला असे विचारले असता त्याने त्यांना शिवीगाळ  दमदाटी करत असताना फिर्यादी हे त्यास तु विनाकारण शिवीगाळ का करत आहे असे त्यास सागत असताना त्याने बाहेर येवुन कोणाला तरी फोन केल्या नंतर यातील आरोपी मजकुर यांनी बेकायदा जमाव जमवुन गर्दी करून आरोपी न १ व २ यांनी तेथे पडलेली काठ्या हातात घेवुन काठ्याने  फिर्यादीस पाठीवर ,हातावर ,डोक्यावर मारहान करीत असताना सदरची भांडणे सोडविण्यासाठी फिर्यादीचे आई वडील आले असताना आरोपी नंबर 1 याने हातात दगड घेवुन माझ्या वडीलाना फेवुन मारले   अपखुशीने दुखापत केली व आरोपी त्यावेळी अ .न  ३ व ४ यानी फिर्यादीची आई  अ नं ५ यानी फिर्यादीची बहीण हिस हाताने लाथाबुक्याने मारहान करून आरोपी मजुकर यानी शिवीगाळ दमदाटी करून निघुन गेले पुढील तपास पो ना खांडेकर हे करीत आहेत.
To Top