सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
नीरा नजीक पिंपरे (खुर्द) येथील आडबाजूला असलेल्या रेल्वे क्रॉसिंग शेजारी ४० वर्षीय व्यक्तीने सकळी सातच्या सुमारास रेल्वे खाली आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
बारामतीच्या वाणेवाडी नजीकच्या मळशी येथील हंबीरराव रत्नसिंह जगताप (वय ४० वर्षे) यानी आपल्या दुचाकीवरून येऊन पुणे पंढरपूर पालखी मार्गालगतच्या व पिंपरे (खुर्द)येथील निरा डावा कालवा व एच.पी पेट्रोल पंपा दरम्यान असलेल्या रेल्वे गेट शेजारी दुचाकी लावून चालत पुणे बाजुकडे जाऊनसमोरुन येणाऱ्या रेल्वे खाली आपला जिव दिल्याचे प्रथम दर्शनी पोली सांनी सांगितले.
म्रुतदेह शवविच्छेदनासाठी जेजुरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असुन. नीरा पोलीस दुरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश गायकवाड, संदिप मोकाशी, हरिश्चंद्र करे, निलेश जाधव, पोलीस मित्र रामभाऊ कर्णवर यांसह जगताप यांचे नातेवाईक उपस्थीत होते. घरगुती वादातून ही आत्महत्या झाल्याची पोलीसांचा अंदाज आहे.