ओमसाई लॉजवर छापा टाकत तीन पीडित महिलांची सुटका : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या महिला भरोसा सेलची कारवाई

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------

शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथे ओम साई  हॉटेल लॉज येथील मॅनेजर व लॉज चालक हे तीन महिलांकडून देहविक्री करून घेऊन त्यातून पैशांची कमाई करत आहे, अशी खात्रीपूर्वक बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट साहेब यांना मिळाली होती, बातमीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी ताबडतोब सदर बतमीबाबत अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग यांचेशी संपर्क साधला.  आदेशाप्रमाणे अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग यांनी लागलीच बातमीची खात्री करून पथक नेमून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी पुणे ग्रामीण स्था.गु.अ. शाखेच्या महिला भरोसा सेल च्या  म. पो. उप निरीक्षक माधवी देशमुख, यांना बोलावून सपोनि सचिन काळे यांचेसह एक पथक तयार करून योग्य त्या सूचना,  मार्गदर्शन देऊन कारवाई करण्यास सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेच्या महिला भरोसा सेल च्या पथकासह पथक कारेगाव येथे कारवाई करिता पोहचल्यानंतर माधवी देशमुख मॅडम यांनी दोन पंच बोलवून घेऊन मिळालेल्या बातमीवर यशस्वी कारवाई करणेकरिता एक योजना आखली आणि एक इसम बनावट ग्राहक म्हणून बोलवून घेतला, आणि त्यास दोन 500 रु च्या नोटा देऊन त्यास ओम साई लॉज येथे बनावट ग्राहक म्हणून जाण्यास सांगितले आणि बातमीची खात्री झाल्यानंतर इशारा करण्यास सांगितले, अशी योजना तयार केली. म पो स ई माधवी देशमुख मॅडम यांचे योजनेला यश आले आणि ओम साई लॉजवर पाठविणेत आलेल्या बनावट ग्राहकाने दिलेल्या इशाऱ्यावर पथक ताबडतोब लॉजवर पोहोचले आणि छापा टाकून  कारवाई केली.  कारवाई मध्ये             ओम साई लॉज चा मॅनेजर शिवकांत सत्यदेव कश्यप आणि चालक पारस बस्तीमल परमार दोघे रा ओम साई लॉज सरदवाडी ता शिरूर जि पुणे असे दोघेजण मिळून आले . हे दोघेजण तीन महिलांकडून देह अपव्यापार करून घेताना मिळून आले, आणि तीन पीडित महिला मिळून आल्या. मपोसई माधवी देशमुख व सपोनि सचिन काळे यांचे पथकाने धडक कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेऊन तीन पीडित महिलांची सुटका केली असून महिला सहा फौजदार  लता जगताप यांनी सदर प्रकरणात शिरूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. 
       सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधीकारी राहुल धस यांचे मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट
सपोनि सचिन काळे, मपोसई माधवी देशमुख,
सहा फौज  शब्बीर पठाण,।सहा फौज तुषार पंधारे,
म सहा फौज लता जगताप , पो. हवा. सचिन घाडगे, 
पो. हवा. जनार्धन शेळके,  पो. हवा. राजु मोमीन, पो. ना. मंगेश थिगळे, पो. ना. अजित भुजबळ, म पो. कॉ. पूनम गुंड, पो हवा मुकेश कदम।यांनी केली आहे.
To Top