सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती तालुक्यातील वीकेंड लॉकडाऊन रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे शहरापाठोपाठ आता बारामतीकर व्यापाऱ्यांसह नागरिकांना देखील दिलासा मिळाला आहे.
बारामतीतील दुकानांची वेळही पुण्याप्रमाणेच रात्री ८ वाजेपर्यंत करावी, ही मागणी मात्र प्रशासन स्तरावर मान्य झालेली नाही. दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंतच 'जैसे थे' सुरू
ठेवण्यास मान्यता असून पुण्याच्या धर्तीवरच परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.
साप्ताहिक सुटीचा दिवस वगळता इतर सर्व दुकाने सर्व दिवस दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत.
जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी मान्यता दिली आहे. तसेच एप्रिलपासून बंद असलेल्या हॉटेल्स, रेस्टॉरंट व बारमध्ये आसनक्षमतेच्या.टक्क्यांपर्यंत ग्राहकांना परवानगी
देण्यात आली आहे. दुपारी ४ नंतर मात्र केवळ पार्सल सेवेला परवानगी दिली आहे. साप्ताहिक सुटी वगळून इतर सर्व दिवस हॉटेल, रेस्टॉरंट, फूड कोर्ट सुरू राहणार आहेत.
याशिवाय लग्नसमारंभ तसेच.मनोरंजन व इतर कार्यक्रमांना ५० प्रेक्षक क्षमतेस तर अंत्यविधीस २०
जणांनाच परवानगी असणार आहे. पार्श्वभूमीवर संध्याकाळी पाचपर्यंत जमावबंदी व काहीसा संध्याकाळी पाचनंतर अत्यावश्यक कारण वगळता संचारबंदी कायमच संपूर्ण ठेवण्यात आली आहे.