सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
दहशत माजवून हप्ते वसुली करणाऱ्या टोळक्यां विरोधात दौंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याचे समोर आले आहे. शहरातील सिद्धार्थ नगर परिसरात दूध विक्रेते व त्यांना चारा विकणाऱ्या व्यापाऱ्याला दमबाजी व मारहाण करून हप्ता मागितल्याने या गुंडांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी दादाराम नामदेव पवार( रा. गोकुळ नगर, पवार वस्ती, (गोपाळवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यागी
रणदिवे, अक्षय माने, आप्पा पानसरे, दादया जोंधळे व इतर
दोघे( सर्व रा. सिद्धार्थ नगर, दौंड.) अशी गुन्हा दाखल
आरोपींची नावे आहेत. या घटनेबाबत दौंड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी हे येथील दूध विक्रेत्यांना चारा विक्रीचा व्यवसाय करतात. दि.८ ऑगस्ट रोजी ११ च्या सुमारास फिर्यादी येथील दूध विक्रेत्यांना चारा देण्यासाठी आले असता, सिद्धार्थ नगर परिसरामध्ये टोळके जमा झाले होते. त्यापैकी त्यागी रणदिवे याने मी दौंडचा भाई आहे, तुझा टेम्पो आमच्या हद्दीतून चालतो, तू मला दोन हजार रुपये दे नाहीतर तुझा टेम्पो येथेच पेटवून देतो अशी धमकी देऊ दहशत निर्माण करत होता. त्यामुळे फिर्यादी हे आपला
दहशत निर्माण करत होता. त्यामुळे फिर्यादी हे आपला
टेम्पो घेऊन दूध विक्रेत्याच्या घरासमोर जाऊन थांबले
असता, सदर टोळके आरडा ओरडा करीत टेम्पोच्या मागे
पळत आल्याचे पाहून फिर्यादी घरात लपून बसले. त्यावेळी
त्यागी आणि त्यासोबत असलेल्या गुंडांनी घरावर हल्ला
केला व घरात लपून बसलेल्या फिर्यादीला त्यांनी बेदम
मारहाण केली.
भांडणे सोडविण्या करिता आलेल्या दूध विक्रेत्यांच्या
घरातील लोकांनाही त्यागी व गुंडांनी आपल्याकडील
लोखंडी सळईने मारहाण केली. हप्ता द्या नाहीतर रस्त्यावर
दिसलात तरी खलास करू अशी धमकी गुंडांनी यावेळी
दिली. दौंड पोलिसांनी सहा जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल केला असून सर्व आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी
सांगितले.