सोमेश्वर महावितरणचे काम कौस्तुकास्पद : महावितरणच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा- पुरुषोत्तम जगताप

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------

महावितरणच्या सोमेश्वर उपविभागाचे काम आदर्शवत असून त्यांनी राबविलेल्या योजनांचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. महावितरण मुळे आपल्या परीसरातील शेतकऱ्यांना शेतीला वेळेत पाणी मिळत असल्याने वीज बील भरून त्यांना सहकार्य करावे असे आवाहन सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी केले. 
             सोमेश्वर महावितरणच्या आढावा बैठकीत(दि.११)रोजी ते बोलत होते. पुर्वी सासवड येथील विभागाशी जोडलेले हे कार्यालय गेल्यावर्षी बारामती विभागाला जोडण्यात आले त्यानिमित्ताने वर्षपुर्तीनिमित्त या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
           यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, पंचायत समिती सभापती निता फरांदे, दुध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, सोमेश्वरचे माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, उपाध्यक्ष शैलेश रासकर, ॲड. रवींद्र माने, उपअभियंता सचिन म्हेत्रे, सरपंच वैभव गायकवाड, तुषार सकुंडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपअभियंता सचिन म्हेत्रे यांनी शासनाच्या कृषी योजना २०२० अंतर्गत येणारा निधी व खर्च, शेतीपंपाची नविन वीज जोडणी, थकबाकी, वसुली, देखभाल व दुरुस्ती, तांत्रिक मंजुरीची कामे, नविन विद्युत रोहित्र याबाबत यावेळी माहिती दिली. करंजे आणि सुपा येथे नविन रोहित्र मंजूर करण्यात आले असून कोऱ्हाळे आणि होळ येथे नविन रोहित्र मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. 
         यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी बारामती तालुक्यातील ग्राहकांची  सासवड येथील कार्यालयात कोणत्याही कामाची दखल घेतली जात नसल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यालय बारामतीशी जोडले गेले असल्याचे सांगत बारामती तालुक्यात यापुढे महावितरणची सर्व कामे तातडीने पुर्ण करण्याचा मनोदय व्यक्त केला. राजवर्धन शिंदे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व अधिकाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.



 
To Top