सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर तालुक्यातील संसद ग्राम जवळार्जुन येथील तरुण पिढीने निर्माण करत घडवले मानवतेचे दर्शन. पूरग्रस्तांसाठी धान्य स्वरूपात घरोघरी जाऊन गोळा केली मदत या मध्ये गणेश तरुण मंडळ जवळार्जुन व एरंडी मळा प्रतिष्ठान यांनी सिंहाचा वाटा उचलला ते देण्यासाठी महाड तालुक्यातील शिरगाव तालुका महाड जिल्हा रायगड या सावित्री नदी पासून 100 मीटर वरील गावाची निवड करण्यात आली तेथील 3 अपार्टमेंट तनिष्क, अरविंद नगर गृहनिर्माण आणि द्वारका मध्ये पहिला मजला पूर्ण व दुसऱ्या मजल्यावर अर्धा म्हणजे जवळ जवळ 25 फूट पाणी शिरले होते व ते 2 दिवस तसेच राहिल्याने या बांधवांनच्या घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू निकामी झाल्या धान्य भिजले ,कागदपत्रे भिजली वाहून गेली 22 जुलै 021 च्या तारखे परेंत इतका भयानक पूर कधीही आला नव्हता शासनाने नेहमी प्रमाणे जून मधेच नोटिसा काढल्या होत्या की जागा खाली करा पण घर प्रपंच सोडून कुठे जाणार जीवावर उदार होऊन ही लोक इथेच राहत आहेत 22 जुलै च्या संध्याकाळी 6-7 वाजता सावित्री नदी जी कोकणातील सर्वात मोठी नदी मानली जाते तिने उग्र रूप धारण केले कोकणातील इतर 15 उपनद्या तिला येऊन मिळतात सलग 10ते 15 तास जोरदार पर्जन्य वृष्टी हवालदिल महाड करांनी काळजावर दगड ठेऊन पोर बाळ ,वयस्कर लोकांना घेऊन घरं आहे तशी सोडली त्यात काय वाहतय आणि काय जातंय हे न पहाता जीव मुठीत धरून उंचावर जाण्यास प्राधान्य दिले यात महाड मार्केट मध्ये 500 मीटर पाणी घुसले होते कापड मार्केट,धान्य गोदाम मंडई सर्व पाण्याखाली... ते पण 2 दिवस..आज तिथे धान्य विकत मिळत नाही ATM ,बँक पास बुक वाहून गेलने पैसे काढता येत नाही, गॅस शेगाड्या बंद पडल्या आहेत नवीन मिळत नाही चूल पेटवायची तर सरपण ओल यात कसा मार्ग काढणार...मग धावून आले इतर शहरातील नातेवाईक आणि वरील माळ्यावरील बांधव ज्यांच्या घरात पाणी गेलं नाही त्यानी आपल्या घरातील धान्य इतरांना देऊ केले ते तरी किती दिवस पुरणार..12 ऑगस्ट 021 रोजी शरद पवारांनी दत्तक घेतले संसद ग्राम जवळार्जुन मधील
काही तरुणांनी निर्णय घेतला व तेथील आपत्ती ग्रस्तांना धान्य स्वरूपात दळून न देता (पिठ जास्त काळ राहत नाही म्हणून )फुल ना फुलांची पाकळी अश्या प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न केला या मध्ये आपण 1,000 किलो धान्य( गहू,ज्वारी,तांदूळ,बाजरी) व 200 किलो केळी 3 अपार्टमेंट मधील 50 कुटुंबाना दिले आहे.