सोमेश्वर रिपोर्टर टीम----
मुळातच आज जग बदलत आहे आणि मुलगा मुलगी समानता झाली आहे , मुलगी ही जबाबदरी नसून जेव्हा ती आदिशक्ती बनते तेव्हा तिच आपल्याला तारते . पूर्ण जन्माचे साकडे तर याच आदिमाया, आदिशक्ती कडे आपण करतो
अश्या स्त्रीजन्माचे स्वागत करण्यासाठी बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर- वाघळवाडी येथील साई सेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व आय सी यू च्या संचालिका डॉ जयश्री भिलारे यांनी मोफत स्त्री सूप्रसुती म्हणजेच नॉर्मल डिलिव्हरी करावयाचे घोषित केले आणि स्त्रीजन्माचे स्वागत करत लहानग्या मुलीला आईच्या कुशीत दिले .
नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत व गोरगरिबांची सेवा करत आजपर्यंत मागील वर्षा पासून सेवा करणारे हे हॉस्पिटल आता ऐक नवीन "मोफत स्त्रीजन्माचे स्वागत" या उपक्रमा मुळे गोरगरिबांना दिलासा मिळत आहे
जन्मदात्या मुलीचे वडील------
तर आमच्या रुग्णाची उंची कमी व प्रथम प्रसूती मुळे प्रसूती नॉर्मल होते की नाही यांबद्दल शंका होती परंतु डॉ जयश्री भिलारे मॅडम व त्यांचे सहकारी यांनी धीर देत नॉर्मल प्रसूती झाली, तसेच बाळ व आई सुखरूप आहे . आम्हा कुटुंबामध्ये लक्ष्मी स्वरूप छोट्या पावलांनी मोफत स्त्रीजन्माचे स्वागत झाले, आम्ही हॉस्पिटल चे डॉक्टर संचालक , डॉ राहुल शिंगटे, डॉ विद्यानंद भिलारे MD, डॉ जयश्री भिलारे , डॉ निता शिगटे यांचे आभार मानतो