सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भिगवण : प्रतिनिधी
लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात अशे मानले जाते मात्र मंडळी सोशल मिडीयाच्या माध्यमातूनही आणि तेही जातपात ,धर्म प्रांत आणि भाषा यांना फाटा देत पंजाब राज्यातील तरुणी महाराष्ट्र राज्यातील तरुणाच्या प्रेमात पडली.इतकच काय हजारो किलोमीटरचा प्रवास करीत प्रियकराच्या घरात पोहोचली.
अगदी सिनेमात घडावी अशी हि स्टोरी याबाबतची सविस्तर हकीकत अशी कि मोबाईल फायर गेम आणि सोशल मिडीयाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील भिगवण गावच्या १९ वर्षाच्या तरुणाची ओळख पंजाब राज्यात राहणाऱ्या तरुणीशी झाली.ओळखीतून एकमेकाबद्दल आकर्षण निर्माण होत त्याचे रुपांतर प्रेमात झाले.मग पुढ काय सुरु झालेल्या चॅटिंग मघ्ये या दोन प्रेमी युगुलाने एकत्र येण्याचे ठरविले .मग काय प्रेमिका पंजाब पासून निम्मे अंतर पार करून आली तर प्रेमी निम्मे अंतर पार करीत प्रेमिकेला आपल्या घरी घेवून आला.मग पुढ काय प्रेमिकेच्या घरच्यांनी शोध घेत पंजाब पासून भिगवणला धडक मारली.
भिगवण येथे आलेल्या पंजाबच्या नातेवाईक यांनी भिगवण पोलीस ठाण्याचे अधिकारी जीवन माने यांना माहिती दिल्यावर पोलिसांनी प्रेमी युगुलाला त्यांच्या नातेवाईकासह पोलीस ठाण्यात बोलावून घेतले.यावेळी पोलीस ठाण्यातील वातावरण एकदम तंग झाल्याचे दिसून आले.मुलीच्या बाजूने आलेली माणसे धड धाकट असल्यामुळे आणि यातून काही वादाचा प्रसंग येवू नये म्हणून पोलिसांची खबरदारी घेण्याचे काम सुरु असल्याचे दिसले.मुलीच्या वडिलाने अनेक प्रयत्न करूनही मुलगी आपल्या प्रियकरा सोबतच राहण्याच्या निर्णयावर ठाम राहिली.आता मुलगी २१ वर्षाची असल्यामुळे कायद्या नुसार तिला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे.तर मुलगा १९ वर्षाचा असला तरी त्याने तिच्याशी लग्न केले नसल्यामुळे कोणतीच कारवाई पोलिसांना करणे शक्य नव्हते.मग काय भिगवण पोलीस या प्रेमी युगुलाच्या बाजूने उभे राहत मुलीच्या नातेवाईकांना समजूत घालीत न्यायालयाच्या आदेशानुसार परत पाठविण्यास यशस्वी झाले.त्यामुळे अखेर पंजाबची प्रेयसी आणि भिगवणचा प्रियकर न्याय देवतेचे आभार मानीत लिव्ह इन रिलेशन मध्ये घरी राहण्यासाठी गेले.
प्रचलित कायद्या नुसार २१ वर्षीय तरुणीला आपला निर्णय घेण्याचे स्वातंत्र आहे.तर १९ वर्षाच्या तरुणाने लग्न केल्यास तो गुन्हा ठरला असता मात्र ते लिव्ह इन रिलेशन मध्ये राहत असल्यास कायदा आडवा येत नाही,त्यामुळे यात कारवाई करत भिगवण पोलिसांनी हे प्रकरण न्यायालयात हजर केले .न्यायालयाने मुलीची बाजू ऐकून घेत तिच्याच बाजूने निर्णय दिल्याने अखेर प्रेमच जिंकलं हे मात्र नक्की….