एकावं ते नवलचं ! झिकापासून बचावासाठी निरोध वापरा : आरोग्य प्रशासनाचा सल्ला

Admin
पुरंदर : प्रतिनिधी

झिकाचा राज्यातील पहिलाच रुग्ण बेलसर (ता.पुरंदर) मध्ये सापडला आणि काही दिवसांपासून बेलसर गाव माध्यमांमध्ये आलं. ही ५५ वर्षीय महिला राज्यातील पहिली झिकाची रुग्ण होती. त्यामुळे केंद्र सरकार व राज्य प्रशासनाकडून बेलसर गावात विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली. त्यातच आता बेलसर गावात पुढील तीन महिने कुठलीही महिला गरोदर राहणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
        झिकाची लागण ही एडिस एजिप्त या डासापासून होते. झिकाची लागण झाल्यानंतर गरोदर महिलांना याचा अधिक धोका असतो. झिकामुळे बाळाच्या मेंदुची वाढ खुंटू शकते किंवा लवकर डिलिव्हरी होण्याची देखील शक्यता असल्याचं तज्ञ सांगतात. म्हणूनच बेलसर गावामध्ये इतर सूचनांबरोबरच पुढील तीन महिने गावात कोणतीही महिला गरोदर राहणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना गावातील विविध भागात मोठ्या फ्लेक्सवर व हँडवल वरुन देण्यात आली आहे.
          ज्या ५५ वर्षीय महिलेला झिकाची लागण झाली होती त्यांना फारसा काही त्रास होत नव्हता. काही दिवसांत त्या बऱ्या देखील झाल्या. प्रशासनाने केलेल्या तपासणीत इतर कोणाला या रोगाची लागण झाली नसल्याचं समोर आल्यानंतर गावातील तणाव हळूहळू कमी झाला. झिकाचा रुग्ण सापडल्यानंतर राज्याच्या आरोग्य पथकाकडून गावाची पाहणी करण्यात आली. त्यांच्याकडून विविध उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या. त्यानंतर केंद्राच्या पथकाने देखील बेलसरला भेट देऊन पाहणी केली. प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं.  

गावाने कुठल्या उपाययोजना केल्या?
झिकाचा जरी एकच रुग्ण गावात सापडला असला तरी डेंग्यू आणि चिकनगुनियाचे १०४ रुग्ण गावात आढळले होते. त्यामुळे डासांची उत्पत्तीची ठिकाणं नष्ट करण्यास गावाने आधीच सुरुवात केली होती. घरोघरी जाऊन पाणी साठवून ठेवलेल्या ठिकाणांची पाहणी देखील करण्यात आली. वापराच्या पाण्यात औषध टाकून त्यात डास अंडी घालणार नाहीत याची खबरदारी देखील घेण्यात आली. प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांबाबत माहिती देताना गावचे उपसरपंच धीरज जगताप म्हणाले, झिकाचा रुग्ण सापडल्यानंतर गावात जनजागृती करण्यास सुरुवात केली. भोंगा गाडीच्या माध्यमातून दारोदारी खबरदारी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या. गावात सर्व ठिकाणी धूर फवारणी देखील करण्यात येतीये. गावातल्या २४ गरोदर महिलांना मच्छरदाणी, ओडोमॉसचं वाटप करण्यात आलं. आशा वर्कर घरोघरी जाऊन या महिलांना सूचना देखील देत आहेत. या महिलांच्या रक्ताचे नमुने देखील तपासण्यास आले असून त्यात कोणीही पॉझिटिव्ह आलं नाही.
-----------------------------
कोरोना लशीचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्यांना बूस्टर डोस घ्यावा लागेल का? गर्भाशयातल्या गाठी कोणाला होतात? त्यावर काय उपचार करता येतात? त्याचबरोबर गरोदर महिलांच्या रक्ताचे नमुने तपासून त्यांना मच्छरदानी, गुडनाईट, ओडोमॉस अशा गोष्टी ग्रामपंचायतीकडून देण्यात आल्या आहेत. गर्भधारणा होऊ नये म्हणून निरोधचं वाटप सुद्धा गावात करण्यात आलं आहे.


कोट.
याबाबत लोकमतशी बोलताना पुरंदर तालूक पंचायत समितीच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उज्वला जाधव म्हणाल्या, "झिकाचा संसर्ग दोन प्रकारे होतो. एडिस एजिप्त डास चावल्यावर हा संसर्ग होऊ शकतो किंवा एखाद्या बाधित व्यक्तीसोबतच्या शारीरिक संबंधातून होऊ शकतो. पुरुषाच्या वीर्यामध्ये साधारण चार महिने झिकाचा विषाणू जिवंत राहू शकतो. त्यामुळे त्या पुरुषामुळे होणारी गर्भधारणा ही झिका रोगाने युक्त असू शकते. त्यामुळेच गावकऱ्यांना आवाहन करण्यात आलं आहे की, चार महिने गर्भधारणा टाळा किंवा निरोध वापरा."


 
To Top