सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवणारे श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांनी देशासाठी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले, सलग 18 लढाया जिंकुन एकदाही हार पत्करली नाही असा महापराक्रमी महाराजा, छत्रपती शिवरायानंतर स्वत:चा राज्याभिषेक करऊन घेणारा एकमेव महाराजा... तेव्हा असा दिग्विजयी महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थान पुणे जिल्ह्यातील मौजे वाफगाव ता.खेड येथे सुमारे 8 ते 10 एकर जागे मध्ये भुईकोट किल्ला या स्वरुपात असुन या अप्रतिम ऐतिहासिक वास्तुची आजही इतिहासामध्ये नोंद आहे. महोदय, एकीकडे आपण रायगड, प्रतापगड, राजगड, शिवनेरी या ऐतिहासिक किल्ल्यांचा विकास आराखड्यामध्ये समावेश केलेला आहे, तर मग होळकरांच्या या ऐतिहासिक किल्ल्याकडे येवढे दुर्लक्ष का? वाफगाव चा हा किल्ला रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात असल्यामुळे शासन त्यावर निधी टाकु शकत नाही तेव्हा तो जर राज्य शासनाकडे हस्तांतरित केला तर शासन त्याची डागडुजी करू शकते. सध्या किल्ल्याची अवस्था प्रचंड पडझडीची झाली आहे, त्यामुळे तो किल्ला ३० ऑगस्ट पूर्वी शासनाकडे हस्तांतरित करावा. अन्यथा रयत शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यालय व त्यासह संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. व बहुजन समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातून ११११ पत्र पाठवणार असल्याचे समितीचे मुख्य सल्लागार बापुराव सोलनकर व समितीचे महासचिव भगवानराव जऱ्हाड यांनी सांगितले
तेव्हा आपण यावर योग्य तो निर्णय घेऊन तसे आदेश रयत शिक्षण संस्थेला द्यावेत अशी मागणी सर्व होळकर प्रेमी, इतिहास संशोधक, दुर्ग संवर्धक तसेच बहुजन समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.