युरिया मिळेना....टेन्शन घेऊ नका ! आता आलाय लिक्विड युरियाचा नवीन पर्याय : वाचा सविस्तर काय आहे दाणेदार युरियाला नवीन पर्याय

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------

शेतकऱ्यांना दाणेदार युरीलाला पर्याय म्हणून लिक्विड युरियाचा सोमेश्वरनगर मध्ये वाणेवाडी गावात कल्याणी अग्रोटेक येथे उपलब्ध करून देण्यात आला आहे.बारामती तालुक्यात वाणेवाडी या ठिकाणी हा लिक्विड युरिया वाणेवाडी येथे उपलब्ध झाला आहे. 
        नविणशोध आणि शेतीचे उत्पन्न वाढवणे ह्यासाठी नेहमी कार्यरत असणा-या में.कल्याणी अग्रोटेक ह्या ठिकाणीं शेतकऱ्याच्या हस्ते युरियाच्या पूजनाच्या  झालेल्या कार्यक्रमावेळी कल्याणी अग्रोटेकचे सागर माळी, चंद्रकांत जगताप, विशाल फरांदे, हेमंत गायवकड, प्रशांत कोरडे, संजय शेडगे, पोपट भोसले, गणेश  शिंदे,संतोष ठोकळे आदी शेतकरी उपस्थित होते. 
      500 मिली आणि 1 लिटर च्या बॉटल मध्ये लिक्विड युरिया उपलब्ध झाला आहे.लिक्विड युरीयाचा वापर  पिकावरती फवारणी , बुडामध्ये आळवणी , ड्रीप मध्ये सोडणे, बॅलर मध्ये सोडून पाटपाण्या द्वारे सोडून पिकांना देता येते. थेट पिकांना युरिया मिळत असल्याने शेतीसाठी उपयुक्त आहे. 100 किलोच्या दानेदार युरिया मध्ये 46 टक्के नायट्रोजन असतो. लिक्विड युरिया मध्ये 1 लिटर 32 टक्के नायट्रोजन असतो.
   न्यानो युरिया "उजाला" हा शेतीची सध्याची गरज पाहता या आपल्या भागातील लोकांची "नायट्रोजन" ( युरिया) मुळे उत्पादनात होणारी घट व पिकांचे नुकसान पाहता गरज पाहून आपल्या भागात सर्व प्रथम अतिशय उत्कृष्ठ अशी "उजाला" युरिया उपलब्ध केली आहे.
    सध्याच्या काळामध्ये पहाता शेतकरी वर्गामध्ये पिकासाठी उपलब्ध असणारी दानेदार युरियाचा खूप मोठा तुटवडा जाणवत आहे.तरी आपल्या भागामध्ये शेतकरी मित्राच्या ऊस बाजरी, मका, सोयाबीन या पिकांची गरज पहाता दाणेदार युरियाला मार्केट मध्ये उपलब्ध असणारा पर्याय शेतकरी मितत्रासाठी उपलब्ध करून दिला आहे.तरी शेतकरी मित्रनि दाणेदार युरिया चा हट्टहास न धरता आपल्या पिकाचे उत्पादनात होणारे नुकसान टाळण्यासाठी लिक्विड युरियाचा चा वापर करावा. त्यामुळे पिकाची वाढ निरोगी व जोमाने होईल व उत्पादन वाढेल.असे मत कल्याणी अग्रोटेकचे  सागर माळी यांनी व्यक्त केले. 
To Top