मुरूम, वाणेवाडी, वाघळवाडीला कोणी तलाठी देता का तलाठी ! तीन महिन्यात तीन बदल्या

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----

बारामती तालुक्यातील मुरूम, वाणेवाडी व वाघळवाडी गावाला गेल्या तीन महिन्यापासून कायमस्वरूपी तलाठीच नसल्याने शेतकऱ्यांच्या अनेक महसुली कामांचा खोळंबा होत आहे. 
            याबाबत बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवक पक्षाचे मा. तालुकाध्यक्ष विक्रम भोसले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इमेल द्वारे याठिकाणी कायमस्वरूपी तलाठी मिळण्याची विनंती केली आहे.  
         गेल्या तीन महिन्यांपूर्वी वाणेवाडी येथील होळकर तलाठी सेवानिवृत्त झाल्यानंतर महिन्याला एक तलाठी बदली अशी अवस्था याठिकाणी झाली आहे. त्यामुळे एक ना धड भराभर चिंद्या अशी या अवस्था वाणेवाडी तलाठी कार्यालयाची झाली आहे. शेतकऱ्यांचा   शेतीवर पिककर्ज घेण्याचे दिवस असून शेतकऱ्यांना सातबारा उतारा मिळत नाहीत तसेच मुलांना शैक्षणिक दाखले देखील मिळत नाहीत. तीन महिन्यात तिसरा तलाठी बदलून गेल्याने सद्या वानेवाडी तलाठी कार्यालयाला कोण वालीच उरला नाही. त्यामुळे वाणेवाडी तलाठी कार्यालयाला कोणी तलाठी देता का तलाठी अशी महण्याची वेळ आली आहे. 
             
To Top