सोमेश्वर रिपोर्टर टीम------
संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या बैठकीत योजनेची १०८ व श्रावणबाळ योजनेची ५० तसेच इंदिरागांधी योजनेतील ६ अशी एकूण लाभार्थींची १६४ प्रकरणे सादर करण्यात आली. होती. त्यापैकी संजय गांधी योजनेची १०२ प्रकरणे मंजूर व ६ नामंजूर करण्यात आली तसेच श्रावणबाळ योजनेची ३८ प्रकरणे मंजूर व नामंजूर १२ आणि इंदिरा गांधी योजनातील सर्व ६ प्रकरणे मंजूर करण्यात आली.
त्याचप्रमाणे राष्ट्रीय कुटुंब योजनेअंतर्गत एकूण १० प्रस्ताव पैकी ८ प्रकरणे मंजूर करण्यात आली. पात्र लाभार्थींना प्रत्येकी २० हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष धनवान वदक, तहसिलदार विजय पाटील, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहुल काळभोर, महादेवभोसले, समितीचे सदस्य सुनिल बनसोडे, शिवराज माने, शहाजी दळवी, लालासो होळकर, निलेश मदने, अशोक इंगोले व सुरेश जराड आदी उपस्थित होते.