सोमेश्वर रिपोर्टर टीम------
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे गेल्या दीड वर्षापासून राज्यातील साखर कारखान्यांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. मात्र गेल्या चार दिवसांपासून राज्य शासनाने राज्यातील जिल्हा बँकांच्या निवडणुकांसाठी हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यामुळे आता साखर कारखान्याच्या निवडणुला लागणार का? याकडे इच्छुकांच्या नजरा लागल्या आहेत.
फेब्रुवारी २०२१ नंतर कोरोनाचा दुसऱ्या लाटेमुळे राज्यातल्या सर्वच निवडणुका ३१ ऑगस्ट पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. सद्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्य शासनाने राज्यातील जिल्हा बँकांच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. त्यामुळे राज्यातील साखर कारखान्यांच्या लांबणीवर पडलेल्या निवडणुका ३१ ऑगस्ट नंतर होणार? की पुन्हा लांबणीवर पडणार याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
निवडणुकांना राज्य शासनाने ३१ ऑगस्ट ही मुदत वाढ दिलेली होती. त्यामुळे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला साखर कारखान्यांच्या निवडणुका होणार का पुन्हा पुढे ढकलाव्या लागणार हे १० सप्टेंबरच्या आत स्पष्ट करावे लागणार आहे.
राज्यातील अनेक सहकारी साखर कारखान्याची सुरू झालेली प्रक्रिया अचानक थांबाबवी लागली होती. त्यामुळे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ज्या ठिकाणी निवडणुकांची प्रक्रिया थांबली आहे. तेथून पुढे सुरू होईल असे स्पष्ट केलेले आहे.