सोमेश्वर रिपोर्टर टीम------
हडपसर परिसरात दुपारी झालेल्या भांडणाच्या रागातून टोळक्याने दोघा भावांवर तलवारीने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी तिघांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.आकाश रवी सरोदे (वय २२), सुदर्शन रामु जाधव (वय १९, रा. सुखकर्ता कॉलनी, फुरसुंगी) आणि अमोल ऊर्फ सागर मल्हारी भिसे (वय २०, रा. फुरसुंगी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या ४ साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत समीर भिमाशंकर नरळे (वय २२, रा. मंगेश तुपे चाळ, कावळेवस्ती) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांच्याबरोबर फिर्यादी व त्यांच्या मित्रांची दुपारी भांडणे झाली होती. त्यानंतर फिर्यादी व त्यांचा मित्र विशाल गायकवाड व त्यांचा भाऊ गणेश हे शेवाळवाडी मार्केटमागील कॅनॉलचे रोडवरुन जात असताना या टोळक्याने त्यांना अडविले.टोळक्याने विशाल व गणेश यांच्यावर तलवारीने डोक्यावर, पाठीवर व हातावर वार करुन जबर जखमी केले. तसेच फरशीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हडपसर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा केला असून तिघांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक अडागळे तपास करीत आहेत.