पुरंदर ! कोळविहीरे येथील माजी सरपंच यांच्या मुलाची आत्महत्या

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------

पुरंदर तालुक्यातील कोळविहीरे गावच्या माजी सरपंचाच्या पंचवीस वर्षे मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केलीय  सचिन हिमंत पवार अस या पंचवीस वर्षीय तरुणच नाव आहे.
         कोळविहीरे येथील माजी सरपंच निर्मलाताई पवार यांचा हा मुलगा असून त्याने स्वतःच्या राहत्या घरात दुपारी 3 च्या दरम्यान आत्महत्या केलीय. याबाबत जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या घटनेची खबर सतीश  अंकुश पवार यांनी जेजुरी पोलिसात दिली. सचिन घराचे दार उघडतं नसल्याने खिडकीतून पाहिले असता त्याने गळफास घेतल्याचे त्यांना दिसून आले. त्यानंतर घरातील लोंकानी दार तोडुन त्यांना खाली उत्तरून घेतले.यावेळी त्याचा  श्वासोश्वास चालु असलेचे दिसलेने त्यास लगेच  जेजुरी येथील आय सी.यु हॉस्पीटल येथे घेऊन गेले मात्र येथील डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे सांगितले. याबाबत सतीश पवार यांनी दिलेल्या  खबरीवरून मयताची नोंद करण्यात आली असून  याबाबतचा अधिकचा तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. फौजदार लोंढे हे करीत आहेत.
To Top