मोठी बातमी ! पुणे ग्रामीण मधील सर्व व्यवसाय आज पासून राहणार पूर्ण वेळ सुरू: जिल्हाधिकारी यांचा काय आहे आदेश वाचा सविस्तर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----

गेल्या काही दिवसापासून पुणे शहरातील सर्व व्यवसाय पूर्ण वेळ सुरू राहतील असा आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी काढला आहे. याबाबत बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी हा आदेश पुढे जारी केला आहे. यानुसार आज दि १६ पासून जिल्हा ग्रामीण मधील दुकाने पूर्वीप्रमाणे सुरू राहतील असे आदेशात म्हणटले आहे.  
        पुणे ग्रामीण मधील दुकाने कधी सुरू होणार याकडे व्यावसायिकांचे लक्ष लागले होते. आज पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी आदेश काढून पुणे जिल्हा ग्रामीण मधील दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट तसेच बार पूर्ण वेळ सुरू राहतील असे आदेश जारी केले आहेत.
To Top