गुड न्यूज ! नीरा देवधर धरण ९९.४० टक्के भरले मात्र.....

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

बारामती, इंदापूर, फलटण आणि माळशिरस या तालुक्यातील शेतकर्यांसाठी आनंदाची बातमी आहे. वीर धरण सद्या ९९.४० टक्के भरले असुन कोणत्याही क्षणी नीरा नदीत पाणी सोडण्यात येईल. 
       आज सकाळी ८.00 वाजता निरा देवघर धरण परिसरात पावसाचे प्रमाण व पाण्याची आवक वाढत असल्याने पाणीपातळीमध्ये वाढ होत असल्यामुळे विद्युत गृहातून ७५० कुसेक्स ने विसर्ग चालू असून आज रोजी धरण ९९.४०% भरले आहे तरी कोणत्याही वेळी धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग निरा नदी पात्रात सोडण्यात येईल   
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी. नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी, निरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये.
To Top