सोमेश्वर रिपोर्टर टीम-- --
गेल्या अनेक दिवसांपासून बारामती तालुक्यात अनियमित कोरोना लसीचा पुरवठा सुरू आहे. उद्या तब्बल सहा दिवसानंतर तालुक्यात लसीचा पुरवठा होत आहे.
कोणी लस देता का लस अशी महण्याची वेळ बारामतीतील नागरिकांच्यावर आली आहे. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर उद्या बारामती तालुक्यात लस उपलब्ध झाली आहे. मात्र नागरीक उद्या सहा पासूनच रांगा लावून उभे असणार आहेत. तालुक्यातील काही महत्वाच्या लोकप्रतिनिधीची गावे वगळता इतर गावातील नागरिकांना लस मिळणार का? लस ५० तर गर्दी ५०० जणांची यावर प्रशासन काही उपाय योजना करणार का नाही?