बैलगाडी शर्यतीचा सराव करणे पडले महागात : चौघांवर गुन्हे दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
लोणंद/प्रतिनिधी 

 लोणंद ता.खंडाळा गावच्या हद्दीत लोणंद ते पिंपरे जाणारे रोड वरील शेळके पाटीलवस्तीच्या पुढील बाजूस असणाऱ्या वीटभट्टीच्या पाठीमागे असलेल्या शेतात मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास बेकायदा बैलगाडी शर्यत मैदान तयार करून बैलगाडीस दोन बैल जुपून शर्यतीचा सराव करत असल्याप्रकरणी लोणंद पोलीसानी चार जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला असुन या घटनेची नोंद लोणंद पोलीस स्टेशनमधे करण्यात आली आहे.
                याबाबत लोणंद पोलीस स्टेशनमधुन मिळालेली अधिक माहिती अशी की लोणंद गावच्या हद्दीत लोणंद ते पिंपरे रोडवरील शेळके पाटील वस्तीच्या पुढील बाजूस असणाऱ्या वीट भट्टीच्या  पाठीमागे असलेल्या शेतात बेकायदा अनधिकृत बैलगाडी शर्यत मैदान तयार करून बैलगाडीस दोन बैल जुंपून शर्यतीचा सराव करत असल्याप्रकरणी तसेच जिल्हाधिकारी सातारा यांनी कोरोनाविषाणु अनुषंगाने दिलेल्या आदेशाचा भंग करून तोंडास मास्क न लावता व एकत्र जमून कोरोनाचा प्रादुर्भाव होईल हे माहित असून देखील मानवी जीवन धोक्यात येईल असे कृत्य करून प्राण्यांना निर्दयीपणे व क्रूरतेची वागणूक देऊन बैलगाडी शर्यतबंदीच्या न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हनुमंत उर्फ पिनु शिवाजी मदने,
बाळू एकनाथ मदने दोघेही रा. खडकी ता. फलटण
सागर नंदू जगताप, वैभव धायगुडे  दोघेही रा. शेळकेवस्ती, लोणंद ता खंडाळा या चौघाविरुद्ध लोणंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार नलवडे हे करत आहेत.
To Top