सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

बारामतीच्या अंगणवाडी बालकांचा विकास झपाट्याने - दत्तात्रय मुंडे

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
 सांगवी : प्रतिनिधी

बारामती तालुक्यात गेली चार वर्षे अंगणवाडीसह बालकांच्या शारीरिक, बौद्धिक,विकासात झपाट्याने भर पडली. पोषण आहाराबरोबरच माझी अंगणवाडी स्वच्छ व सुंदर अंगणवाडी या उपक्रमाद्वारे बालविकास प्रकल्प अधिकारी मिथुनकुमार नागमवाड यांनी  बालकांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण केली. असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे केले.
 
शरदचंद्रजी पवार सभागृह पुणे येथे दरवर्षीप्रमाणे सप्टेंबर राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा केला जातो, त्यानिमित्त बालकांना पोषण आहार मिळण्यासाठी रूपरेषा ठरविण्यासाठी पुणे जिल्ह्यातील बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. दरम्यान बारामतीचे बालविकास प्रकल्प अधिकारी मिथुनकुमार नागमवाड यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत यांची नांदेड येथे बदली झाल्याने त्यांना निरोप देत मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला,त्या दरम्यान मुंडे बोलत होते. पुढे ते म्हणाले कोरोना काळात शासकीय योजनांसह बालकांसाठी योग्य व नियमित आहार मिळण्यासाठी त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.तसेच तत्कालीन महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे,महाविकास विकास आघाडीच्या महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी शाबासकीची पाठीवर थाप दिली होती.
 
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मार्फत बालकांसाठी योग्य पोषण आहार,महिला शक्तीचा जागर,माझी कन्या भाग्यश्री योजना,राष्ट्रीय कन्या दिन,जागतिक हात धुवा दिन,जागतिक बालिका दिन,सही पोषण देश रोशन राष्ट्रीय पोषण जन जागृती अभियान, पोषण सप्ताह, या सह विविध उपक्रम राबवून तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांत २०० हून अधिक सेंद्रीय परसबाग निर्माण करण्यात आल्या.पर्यावरण दिना निमित्त बालकांच्या हस्ते वृक्षारोपण, प्रत्येक अंगणवाडी केंद्राला पिण्याच्या पाण्याचा नळ,वीज कनेक्शन,डिजिटल अंगणवाडीसाठी विशेष प्रयत्नातून लोकसहभागासह जिल्हा परिषदेकडून टीव्ही मिळण्यासाठी परिश्रम घेत असे विविध विधायक कामे त्यांनी पार पाडली.
 
तसेच बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने वैयक्तिक व बाह्य स्वच्छतेकडे विशेष लक्ष देऊन मुलांच्या बौद्धिक,शारीरिक,मानसिक विकसासाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येत होते. सकस आहाराच्या माध्यमातून कुपोषणमुक्तीकडे वाटचाल चांगल्या रीतीने पार पाडली. जागतिक महिला दिना निमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करून महिलांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम केले.
 

 
 

COMMENTS


Name

blogg,2,breaking,1,Breaking New,1,Breaking News,2009,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breking news,3,karate,1,video,1,क्राईम,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : बारामतीच्या अंगणवाडी बालकांचा विकास झपाट्याने - दत्तात्रय मुंडे
बारामतीच्या अंगणवाडी बालकांचा विकास झपाट्याने - दत्तात्रय मुंडे
https://lh3.googleusercontent.com/-lf5_6rwZbvc/YS9R0cpvtmI/AAAAAAAALUA/wOqa6W8ro94Fd-IcepcP3vY1sITcgElnwCLcBGAsYHQ/s1600/1630491077891866-0.png
https://lh3.googleusercontent.com/-lf5_6rwZbvc/YS9R0cpvtmI/AAAAAAAALUA/wOqa6W8ro94Fd-IcepcP3vY1sITcgElnwCLcBGAsYHQ/s72-c/1630491077891866-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2021/09/blog-post.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2021/09/blog-post.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy