बारामती l सायंबाचीवाडी चे उपसरपंच प्रमोद जगताप यांच्या विरोधातील अविश्वास ठराव मंजूर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

बारामती तालुक्यातील सायंबाचीवाडी येथील ग्रामपंचायतचे उपसरपंचपदी प्रमोद दिलीप जगताप यांच्याविरोधात दाखल केलेला अविश्वास ठराव आज ग्रामपंचायतच्या विशेष सभेत चार विरुद्ध शून्यने मंजूर झाला. 
        याबाबत  ग्रामपंचायत सदस्यांनी  तहसीलदार यांच्याकडे जगताप यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. यावर आज बारामतीचे प्रभारी तहसीलदार महादेव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामध्ये चार विरुद्ध शून्य मताने हा ठराव मंजूर करण्यात आला. 
          ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेणे तसेच मनमानी कारभार करणे आदी कारणास्तव सायंबाचीवाडी सरपंच चे हनुमंत किसन भगत, सदस्य गणेश विश्वास भापकर, शीतल नारायण भापकर आणि शारदा शांताराम भापकर यांनी याबाबत बारामतीचे तहसीलदार यांच्याकडे हा ठराव दाखल केला आहे. याबाबत तहसीलदार यांनी दि २६ ऑगस्ट रोजी काढलेल्या नोटीसीत म्हटले होते की, सायंबाचीवाडी चे उपसरपंच प्रमोद दिलीप जगताप  यांचेविरुध्द ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ३५ अन्वये दिनांक २६/८/२०२१ रोजी अविश्वास ठरावाची नोटीस  हनुमंत किसन भगत व इ. ३ ग्रामपंचायत सायंबाचीवाडी सदस्य यांनी सादर केली असून सदर बाबत विशेष सभा दिनांक ०१/०९/२०२१ रोजी दुपारी ठिक ३.०० वाजता ग्रामपंचायत कार्यालय सायंबाचीवाडी, ता. बारामती येथे तहसिलदार बारामती यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे असे तहसीलदार यांनी काढलेल्या नोटीसीत म्हणटले आहे. 
            त्यानुसार आज दि १ रोजी सायंबाचीवाडी ग्रामपंचायत ची विशेष सभा बोलावून जगताप बोलावली. सत्ताधाऱ्यांच्या बाजून चार तर विरोधकांच्या बाजून शुन्य मतदान झाल्याने प्रभारी तहसीलदार भोसले यांनी हा अविश्वास ठराव मंजूर केला.
To Top