सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
गेल्या सात वर्षापासून नवऱ्यापासून विभक्त, पदरात दोन लहान मुलं, राहण्यासाठी आई वडिलांनी आश्रय दिला असला तरी जगण्यासाठी आधी दोन वर्षे शेतात मोलमजुरी तर सात वर्षापासून सोमेश्वरनगर येथील एका कापड दुकानात काम, सव्वादोनशे रुपयात सकाळी ९ ते रात्री ७ वाजेपर्यंत काम करत शिकण्याची जिद्द उराशी बाळगून वयाच्या ३० व्या वर्षी तिने बारावीच्या परीक्षेत ६५ टक्के गुण मिळविले.
वाघळवाडी- कन्नडवस्ती येथील शीतल बाळासाहेब बाबर असे तिचे नाव आहे. १३ वर्षापूर्वी जिंती ता फलटण येथील संतोष रिठे यांच्याशी तिचा विवाह झाला मात्र नवऱ्याच्या वाईट सवयीमुळे गेल्या नऊ वर्षपासून शीतल या विभक्त राहतात. आई वडिलांच्या गावी आल्यानंतर सुरुवातीला दोन वर्ष त्यांनी शेतात मोलमजुरीची कामे केली त्यानंतर गेली सात वर्ष त्या कापड दुकानात काम करत आहेत. आता थोरली मुलगी सातविला आहे तर मुलगा सहाविला आहे. मुलांचं शिक्षण , घर आणि नोकरी सांभाळत बारावीचा अभ्यास करण कठीण होतं पण रात्री तसेच पहाटेचा अभ्यास करावा लागायचा तसेच दुकानात फावल्या वेळेत पुस्तक वाचत बसायचे असे शीतल बाबर यांनी सांगितले.
दहावीची परीक्षा सतरा नंबरचा फॉर्म भरून पास झाले अकरावीला आठवड्यातून एक दिवास महाविद्यालय केलं. कामाच्या ताणामुळे रोज महाविद्यालयात जात येत नव्हत. पुढे देखील शिकण्याची जिद्द असल्याचे सांगत यशवंतराव चव्हाण मुक्तविद्यपिठात प्रथम वर्ष कला मध्ये प्रवेश घेणार असल्याचे बाबर यांनी सांगितले.