पुरंदर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
नीरेतील कुख्यात गुंड गणेश रासकरचा खुन करण्यासाठी धारदार हत्यारांची जमवाजमव केली होती. ती हत्यारे एका खोलीतून पोलीसांनी ताब्यात घेताना हत्यारे ताब्यात असलेले व खुनाच्या कटातील अणखी दोघा संशयीतांना जेजुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोघांवर हत्यारबंदी कायदा प्रमाणे कारवाई करण्यात आलेली असून रासकर हत्या प्रकरणात आतापर्यंत सहा संशयीतांना अटक केल्याची माहिती जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक सुनील महाडीक यांनी दिली आहे.
जेजुरी पोलीसांना दिलेल्या माहितीनुसार सोमवार दि. २ ऑगस्ट रोजी जेजुरी पोलीस ठाण्यास खात्रीशीर माहिती मिळाली की नीरा (ता.पुरंदर) येथे काही दिवसांपूर्वी गणेश रासकर या गुंडाचा खून झालेला होत. त्याचा खुन करण्यापूर्वी आरोपी गौरव लकडे, निखील रवींद्र ढावरे व कटात सहभागी असणारा गणेश जाधव यांनी गणेश रासकर याला संपवण्यासाठी हत्यारांची जमवाजमव केली होती. ही धारदार हत्यारे अविनाश विष्णू भोसले (वय २७) व विठ्ठल अशोक मोहिते (वय २१) दोघेही रा. नीरा प्रभाग क्र.६ यांच्या ताब्यात दिली होती. त्यांनी जर कोणास माहिती दिली तर त्यांना सुद्धा मारण्याची धमकी दिली होती. परंतु वरील तिघांनी त्याचा पिस्तुलाने गोळ्या घालून खून केला होता. परंतु जी धारदार हत्यारे गणेश रासकरला मारण्यासाठी आणून ठेवली होती ती एका खोलीत वरील दोघांच्या ताब्यात अद्यापही आहेत, अशी माहिती मिळाल्याने पोलीस पथकाने नीरा मध्ये जाऊन शोध घेतला. त्याठिकाणी ६ धारदार हत्यारे मिळाली. त्यामुळे सध्या मा. जिल्हाधिकारी यांचा हत्यारबंदी आदेश लागू आहे, त्याचेही उल्लंघन झालेला आहे. वरील अविनाश भोसले, विठ्ठल मोहिते व जेलमध्ये असणारे निखील ढावरे, गौरव लकडे व गणेश लक्ष्मण जाधव, जगन्नाथ जाधव यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ व हत्यारबंदी कायदा कलम ४२५ प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.
ही धडक कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरीचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर, कैलास गोतपगार, पोलीस हवलदार संदीप कारंडे, संदीप मोकाशी, पोलीस नाईक धर्मवीर खांडे, चालक पोलीस नाईक भानुदास सरक, पोलीस शिपाई तात्यासाहेब खाडे, यांनी केलेली आहे.