बारामती तालुक्यात १२४२ ॲन्टीजेन तपासणी २८ कोरोना पॉझिटिव्ह

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
 
  बारामती तालुक्यामधील ग्रामीण भागातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, आज पंचायत समिती, आरोग्य विभागामार्फत शहर व ग्रामीण भागात घरोघरी जावून ॲन्टीजेन तपासणी करण्यात आली .
          ॲन्टीजेन तपासणी शिबीर गोजुबावी, होळ, मोंढवे, कांबळेश्वर, वाकी, पळशी, सह्याद्री अकॅडमी, तांबेनगर,  आर.एच.सुपा, डोर्लेवाडी, फलटण रोड मळद, जीएमसी सीसीसी या ठिकाणी  राबविण्यात आले. यामध्ये  सह्याद्री अकॅडमी येथे 195, तांबेनगर येथे 213,    डोर्लेवाडी येथे 09, फलटण रोड मळद येथे 79 जीएमसी सीसीसी येथे 110 तपासण्या करण्यात आल्या. या तपासण्यामध्ये एकही पॉझिटिव्ह रूग्ण मिळाला नाही. तसेच गोजुबावी येथे  81  तपासणी मध्ये 02, होळ  येथे 123  तपासणीमध्ये 07, मोंढवे  येथे 103  तपासणीमध्ये 02, कांबळेश्वर येथे 94 तपासणीमध्ये 06, वाकी येथे 107 तपासणीमध्ये 02, पळशी येथे 107 तपासणीमध्ये 02, आर एच सुपा येथे 21 तपासणीमध्ये 07 असे एकूण 28  कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले. शहर आणि ग्रामीण भागामध्ये आज एकूण 1242 ॲन्टीजन तपासणी करण्यात आल्या, असे पंचायत समिती  आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे.
To Top