सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
जुबिलंट भारतीया फाऊंडेशन तर्फे जुबीफार्म या प्रकल्पाअंतर्गत शेतकर्यांना 15000 फळझाडांच्या रोपांचे वाटप करण्यात आले आहे. झाडांच्या वाढीसाठी जुबिलंट कृषीमित्रांची नेमणूक करून त्यांच्यामार्फत मार्गदर्शन केले जाईल. जुबीफार्म या प्रकल्पाअंतर्गत फळांची रोपे ही 10 गावांना वितरीत करण्यात आली असून यामध्ये 250 शेतकर्यांचा समावेश आहे. या फळझाडांच्या रोपांमध्ये आंबा, पेरू, चिकू, नारळ,अंजिर ही रोपे देण्यात आली आहेत. हा उपक्रम गडदरवाडी येथे पार पडला. हा रोप वाटपाचा कार्यक्रम जुबिलंटचे उपाध्यक्ष सतिश भट यांच्या हस्ते पार पडला.या कार्यक्रमासाठी जुबिलंटचे सहउपाध्यक्ष सुब्ह्रमण्यम भट,इंजिनिअरींग विभागप्रमुख राजेंद्र राघव,बायोकंपोस्ट विभागप्रमुख मधुकर घोगरे,सेक्शन इनचार्ज संजय आदिसरे,जनसंपर्क अधिकारी इसाक मुजावर,सीएसआर प्रमुख अजय ढगे,आयटी विभागाचे प्रमुख अभिषेक, सरपंच संतोष गडदरे आणि गडदरवाडीचे पंचायत सदस्य आदी यावेळी उपस्थित होते.