सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
अडीच वर्षापुर्वी जगन्नाथ लकडे ,गणेश आळंदीकर
अनिल शिंदे व बाळासाहेब शेंडकर यानी सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक संघटना स्थापन केली मात्र सैनिकांचे प्रश्न सोडवता सोडवता त्यानी सामाजीक कार्याला सुरुवात केली.
२०१९ मधे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सैनिक टाकळी येथील नागरीकाना प्रत्यक्ष जावुन एक ट्रक किराणा व धान्य मदत,२०२१ मधे महाबळेश्वर तापोळा रस्त्यालगत दरडग्रस्ताना मदत ,कोव्हीड काळात हजारो गरीब मजुर ,परप्रांतीय नागरीक ,पारधी समाज ईत्यादीना या संघटनेद्वारे किराणा कीट पुरवण्यात आली याशिवाय पोलीसाना निवडणुक काळात मदत ,अनेक वाद पोलीसापर्यंत न जावुन देता मिटवुन अनेक सैनिकाना केलेली मदत वैशिष्ट्यपूर्ण ठरली सुमारे ३५० आजीआजी सैनिक या संघटनेत काम करीत आहेत कोणतेही शासकीय अनुदान नसताना हे लोक वर्गणीतुन समाजकार्य करीत असतात .
आज ही बारामती तालुका आजी माजी सैनिक संघटना व सोमेश्वर स्पोर्ट्स ॲकॅडमी यांचे वतीने निंबुत येथील सुरेश बाजीराव भंडलकर या गरीब व्यक्तीचा तीन वर्षाचा नातु डॉ मुथा बारामती यांच्या प्रयत्नाने ठिक झाला. लाखो रुपये खर्च झाले बीलासाठी डॉ सौरभ काकडे यानी देखील मदत केली . दवाखान्याने मेटाकुटीला आलेल्या पालकाना मेडीकल चे ७७००/- रु भरणे देखील अवघड झाले होते "समाजसेवा" गृप चे ॲडमीन मदन काकडे यानी मदतीचे आवाहन केले .त्यावर बारामती तालुका आजी माजी सैनिक संघटना सोमेश्वरनगर व सोमेश्वर स्पोर्ट्स ॲकॅडमी तर्फे गणेश आळंदीकर ,अध्यक्ष अनिल शिंदे ,कार्याध्यक्ष बाळासाहेब शेंडकर ,बाळासाहेब गायकवाड, नितीन शेंडकर ,ओंकार कुंभार ई नी मेडीकल साठी रक्कम ७७००/- रोख त्याना मदत दिली .