मुलगी झाली म्हणून पत्नीचा गळा आवळून खून : पतीला अटक

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मावळ : प्रतिनिधी

मुलगी झाल्याच्या रागातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी (दि. २८) सकाळी ८ वाजता चंदनवाडी, चांदखेड, ता. मावळ येथे उघडकीस आली. एक मुलगी आहे. मुलगा का झाला नाही? यावरून पती आणि पत्नीत वारंवार वाद होत होते. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
       चांगुणा योगेश जाधव (वय २० रा. चंदनवाडी, चांदखेड, ता. मावळ) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. याबाबत शवाजी दामू ठाकर (वय ४३ रा. ठाकरवाडी, परंदवाडी, ता. मावळ) य तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसा पोलिसांनी योगेश कैलास जाधव (वय २६) याच्या विरोधात गु दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत चांगुणा आणि योगेश याचा चार वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांचा संसार सुखाचा सुरू होता. त्यांना मुलगी झाली. मात्र यावर योगेश नाराज होता. त्याला मुलगा हवा होता. यातूनच त्यांच्या सुखी संसाराला नजर लागली. मुलगी झाली आणि मुलगा झाला नाही म्हणून योगेश भांडायचा. तसेच चांगुणाला मारहाण करायचा.दरम्यान, शनिवारी पहाटेच्या सुमारास चांगुणा कपडे धुत होती. तर, लहान मुलगी गाढ झोपेत असताना चांगुणा यांचा गळा पती योगेशने आवळत खून केला. संबंधित घटनेची कुणकुण शेजाऱ्यांना लागली त्यांनी तातडीने शिरगाव पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी आरोपी योगेशला अटक केली असून खून केल्याची माहिती दिली आहे. घटनेचा अधिक तपास शिरगाव पोलीस करत आहेत.
To Top