सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
बारामती तालुक्यातील गेल्या आठ दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तालुक्यात सद्या ८० ते ९० च्या आसपास रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट ३.९७ वर गेला आहे. हा पॉझिटिव्हीटी रेट ५ वर गेल्यास बारामतीत पुन्हा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
दरम्यान प्रधाशासनाच्या वतीने लॉकडाऊन बाबत कोणत्याही हालचाली होत नाहीत मात्र पोझिटिव्हीटी रेट पाच वर गेल्यास बारामती लॉकडाऊन होऊ शकते.
कालचे शासकीय दि २८ एकूण rt-pcr नमुने ५१०
एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-३२. प्रतीक्षेत -००.
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण १३
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---७८ त्यापैकी पॉझिटिव्ह -१६ कालचे एकूण एंटीजन -१५५१ त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.३०
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ७८
शहर-३३ ग्रामीण-४५
एकूण रूग्णसंख्या-२८५३७
एकूण बरे झालेले रुग्ण-२७४६२
एकूण आज डिस्चार्ज-६२
मृत्यू-
१५
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण-४० पैकी बारामती तालुक्यातील- ३१
इतर तालुक्यातील-९ त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -४