विनामास्क फिरणाऱ्यांनो सावधान ! वडगाव निंबाळकर पोलिसांकडून एका दिवसात ५२ जणांकडून वसूल केला तब्बल एवढा दंड

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----------

बारामती शहर व ग्रामीण परिसरात दिवसेंदिवस कोरोणा रुग्णांची संख्या वाढत असून बारामतीची वाटचाल लॉक लोक डाऊनच्या  दिशेने चालली असल्याचे चित्र दिसत आहे  
            कोरोना विषाणूचा बारामती तालुक्यातील वाढत्या प्रादुर्भावाचे अनुषंगाने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन कडून आज दिनांक २६/०८/२०२१ रोजी पोलीस स्टेशन हद्दीच्या अंतर्गत विनामास्क वावरणाऱ्या ५२ नागरिकांकडून प्रत्येकी ५०० रुपये या प्रमाणे २६,०००/- इतका दंड आकारण्यात आलेला आहे.
            कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव  वाढण्यास पुन्हा सुरुवात झालेने राज्य शासनाचे ब्रेक द चेन अंतर्गत दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन नागरिक, आस्थापना चालक,हॉटेल व्यवसायिक, मंगल कार्यालय चालक यांनी करणेचे आवाहन वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सपोनि सोमनाथ लांडे यांनी केलेले असून यापुढील कालावधीत जे नागरिक सार्वजनिक ठिकाणी विनामास्क वावरताना आढळतील, त्यांचेवर जास्तीत जास्त दंडात्मक कायदेशीर कारवाई करणेत येईल, तसेच आस्थापना, हॉटेल,मंगल कार्यालये यांची अचानक तपासणी करून नियमबाह्य आढळणाऱ्या आस्थापना चालकांवर कायदेशीर गुन्हे दाखल करून सदर आस्थापना सील करणेसाठी मा.उपविभागीय अधिकारी सो बारामती यांचे अहवाल सादर करण्यात येणार असलेबाबतची माहिती त्यांनी दिलेली आहे.
To Top