तीन गावातील हातभट्टी व्यवसायावर कारवाई करत पोलिसांनी नष्ट केला १ लाख १५ हजाराचा माल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

 दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशन अंकीत असणाऱ्या केडगाव पोलीस दुरक्षेत्र हददीतील केडगाव, बोरीपार्थी, चौफुला या तीन गावांच्या हद्दीतील गावठी हातभटटीच्या अवैद्य धंद्यांवर यवत पोलिसांनी धडक कारवाई करीत १ सुमारे  लाख १५ हजार ५०० रुपयांचा दारू साठा व कच्चा माल नष्ट केला आहे. 
             या कारवाईमध्ये हातभटटी मध्ये दारू तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन, साधणे हि जेसीबी च्या साहाय्याने नष्ट करण्यात आली आहेत. यवत चे नवनियुक्त पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी यवत पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच अवैद्य धंद्यांवर जोरदार प्रहार केल्याने आता दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. वरील कारवाई  पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, मा.अप्पर पोलीस अधिक्षक बारामती मिलींद मोहीते, उपविभागीय अधिकारी दौंड राहुल धस, यांचे मार्गदर्शनाखाली  यवत पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नारायाण पवार यांच्यासह त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक गंपले, पो हवा कदम, पो हवा भोसले, पो ना दौंडकर, पो ना जगताप, पो ना काळे, पो ना आवाळे, पो कॉ बाराते, पो कॉ रणदिवे, पो कॉ सुपेकर,पो कॉ भोसले, पो काँ भापकर, मपोका सुर्यवंशी यांनी केली आहे. पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पी. आर. गंपले हे करीत आहेत.
To Top