सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती तालुक्यात उद्या 31 रोजी बजाज ग्रुप तर्फे लसीकरण होणार असून बारामती शहर व ग्रामीण भागात 91 ठिकाणी लस उपलब्ध होणार आहे.
खालील दिलेल्या गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत जेथे जागा उपलब्ध होईल अशा ठिकाणी हे लसीकरण पार पडणार आहे. बजाज ग्रुप च्या सौजन्याने पुणे जिल्हा परिषदेला मिळालेल्या कोविशिल्ड लसीचे लसीकरण उद्या दिनांक 31/8/2021 रोजी बारामती तालुक्यामध्ये एकूण ग्रामीण भागामध्ये 85 व शहरी भागामध्ये 06 लसीकरण केंद्रांवर सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत लसीकरण होणार आहे या लसीकरणा मध्ये 18 वर्षावरील सर्व लोकांना पहिला डोस व 84 दिवस पूर्ण झालेल्या प्रलंबित लाभार्थ्यांना दुसरा डोस दिला जाणार आहे त्यासाठी प्रत्येक ठिकाणी पहिला डोस व दुसरा डोस अशा स्वतंत्र रांगा लावण्यात येतील तसेच महिलांसाठी स्वतंत्र रांग करण्यात येईल तरी नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण लसीकरण केंद्रावर शिस्तीचे पालन करून उद्याचा महा लसीकरण दिवस शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे. उद्या एका दिवसासाठी बारामती तालुक्याला एकूण 19 हजार डोसेस प्राप्त झाले असून हे सर्व डोस उद्या एका दिवसातच वापरले जाणार आहेत त्यामुळे केंद्रावर मिळालेली लस संपेपर्यंत लसीकरण सुरू राहणार आहे तसेच प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन करायचे आहे. लसीकरण केंद्रांवर जाताना प्रत्येकाने मास्क चा वापर करावा तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे व आपला नंबर आल्यानंतरच लसीकरण करून घ्यावे. तसेच हॉटस्पॉट गावांमध्ये लसीकरण केंद्रांवर एंटिजेन तपासणी करण्यात येणार आहे त्यासाठीसुद्धा नागरिकांनी सहकार्य करावे.बारामती तालुक्यामध्ये खालील लसीकरण केंद्रांवर उद्या महा लसीकरण दिवस साजरा करण्यात येणार आहे
1 बारामती डोर्लेवाडी
2 गुणवडी
3 सोनगाव
4 झारगड वाडी
5 मळद
6 करंजे
7 मगरवाडी
8 करंजेपूल
9 सोरटेवाडी
10 कोऱ्हाळेखु.
11 मुरुम
12 निंबुत
13 गरदरवाडी
14 सस्तेवाडी
15 चोपडज
16 होळ
17 सदोबाचीवाडी
18 वडगाव ननंबाळकर
19 वाघळवाडी
20 वाणेवाडी
21 ढेकळवाडी
22 कन्हेरी
23 काटेवाडी
24 पिंपळी
25 जळगाव क.प.
26 कऱ्हावागज
27 अंजनगाव
28 मेडद
29 लोणीभापकर
30 मुढाळे
31 पळशी
32 मासाळवाडी
33 सुपा 1
34 वढाणे
35 कुतवळवाडी
36 कारखेल
37 देऊळगाव रसाळ
38 सोनवडी सुपे
39 जळगाव सुपे
40 कऱ्हाटी
41 नारोळी
42 तरडोली
43 बाबुडी
44 मोरगाव
45 सुपे 2
46 दंडवाडी
47 आंबी बु
48 वाकी
49 जोगवडी
50 मोराळवाडी
51 मोढवे
52 मुटी
53 कोऱ्हाळे बु.
54 थोपटेवस्ती
55 माळेगाव खु.
56 माळेगाव बु.
57 पाहुणेवाडी
58 येळेवस्ती
59 ढाकाळे
60 सोनकसवाडी
61 कुरणेवाडी
62 मानप्पावस्ती
63 धुमाळवाडी
64 पणदरे
65 मेखळी
66 घाडगेवाडी
67 कुरवली
68 सांगवी
69 कांबळेश्वर
70 लाटे
71 माळवाडी लाटे
72 शिरषणे
73 नीरावागज
74 खांडज
75 सावळ
76 वंजारवाडी
77 बऱ्हाणपूर
78 पारवडी
79 उंडवडी सुपे
80 निंबोडी
81 कटफळ
82 शिरसुफल
83 साबळेवाडी
84 गोजूबावी
85 उंडवडी क.प.
86 मनहर्ला हॉस्पिटर्ल बारामती
87 शारदा प्ांगण
88 न.प.शाळा क्रमांक 5
89 माळेगाव कॉर्लनी
90 श्रीमंत आबा गणपती
91 फकरी फाउंडेशन