सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती तालुका आजी माजी सैनिक संघाचे मुख्य कार्यालय सोमेश्वरनगर येथे ध्वजारोहण उत्साहात पार पडले सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, व वीर पत्नी सुळ यांच्या हस्ते करण्यात आले .बारामती तालुका क्रिडा अधिकारी जगन्नाथ लकडे करंजेपुल चे पोलीस उपनिरिक्षक योगेश शेलार ,करंजेपुल चे सरपंच वैभव गायकवाड, ॲड.आदेश गिरमे ,सोमेश्वर स्पोर्ट्स ॲकॅडमी चे अध्यक्ष भाऊसो लकडे ,वीर पत्नी सुळ आदी मान्यवर यावेळी हजर होते .
यावेळी सैनिक संघटनेत उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या सैनिक संघटनाना सामाजीक उपक्रमात मदत करणाऱ्या तसेच विविध संस्थाद्वारे परिसरातील विविध संघटना व ग्रामस्थ यांच्या सामाजीक कार्याबद्दल त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करणेत आला .बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाले बद्दल युवराज खोमणे यांचा सत्कार करणेत आला .तसेच करंजे ,चौधरवाडी येथील प्रणाली गृप चे बुवासो हुंबरे, पत्रकार काशिनाथ पिंगळे, विनोद गोलांडे, तुषार धुमाळ यांचेसह वीर पत्नींचा तसेच आय.टी.मधे मोठे योगदान देणारे सुयश पवार,फत्तेसिंग गायकवाड.. ई चा सत्कार करणेत आला .कार्याध्यक्ष बाळासाहेब शेंडकर ,राजाभाऊ थोपटे ,चंद्रकांत सोनवणे,भगवान माळशिकारे ,नितीन शेंडकर ,मोहन शेंडकर,बाळासाहेब रासकर ,बी एल जगताप ,किरण जगताप ,ई सैनिकानी मान्यवरांचे स्वागत केले .
प्रास्तावीकामधे तक्रार निवारण कमिटी अध्यक्ष गणेश आळंदीकर यानी सैनिक संघटनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत २०१९ व २०२१ च्या संकटात दोन ट्रक धान्य व किराणा किट ,कोव्हीड च्या काळात अनेक गरीब परप्रांतीय याना केलेली मदत याशिवाय आजी माजी सैनिकांचे कमिटी द्वारे मिटवलेले वाद या बाबत माहीती दिली त्याना सैनिकाबरोबर सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम दादा जगताप , वडगाव निबाळकर चे स पो नि सोमनाथ लांडे ,पी एस आय शेलार व सहकारी वर्गाने तसेच परिसरातील संस्था व ग्रामस्थांनी केलेल्या मदतीबद्दल आभार मानले .
संस्थापक जगन्नाथ लकडे यानी मनोगतामधे संस्था स्थापन करताना मोजक्या लोकांच्या सहभागात आता चारशे च्या आसपास सैनिक आमच्याबरोबर काम करीत असल्याचे सांगीतले. सुत्रसंचालन अनिल शिंदे यानी केले तर आभार जगन्नाथ लकडे यानी मानले .