सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मागील महिण्यात दिवे घाटात एका नवरी मुलगी चारचाकी वाहनांच्या बोन्टवर बसून लग्नाला गेली होती. त्यावेळी गुन्हा दाखल झाल्याचे उदाहरण ताजे असतानाच आता पुन्हा पुरंदर तालुक्यातील भिवरी गराडे रोडवर अतिउत्साही दोन युवक कारच्या बोनटवर बसुन धोकेदायक स्टंट करताना दिसुन आले. आत पुरंदरची पोलीस यंत्रणा काय भूमिका घेते याकडे पुरंदरकरांचे लक्ष लागुण राहाले आहे.
पुरंदर तालुक्यातील भिवरी गराडे रोडवरील चतुर्मुख मंदिर परिसरात अनेक भाविक दर्शनासाठी त्याचबरोबर निसर्गरम्य परिसर असल्याने पर्यटनासाठी येत असतात. परंतु नुक्तेच चतुर्मुख मंदिराच्या बाजूला असलेल्या धोकादायक घाटा मधून आतिउत्साही दोन युवकांनी चित्तथरारकरीत्या गाडी नं MH 14 GY 3336 च्या बोनटवर बसुन प्रवास केला. गाडी चालकाला पुढील काही भाग दिसत नसल्याने बोनटवरी एक युवक हातवारे करत चालकाला रस्ता सांगतानाचा व्हिडिओ व्हारल झाला आहे. अशा पद्धतीने धोकेदायकरित्या कार चालवून जीवघेणा प्रवास केल्याने सर्व भाविक त्यांच्या कृत्याकडे पहतच राहिले. या अतिउत्साही युवकांना कायद्याच्या धाकाचा ही विसर पडल्याच या ठिकाणी पाहवयास मिळते.
पुण्यातील पुरंदर तालुक्याच्या भिवरी गराडेच्या सीमेवर असलेल्या चतुर्मुख घाटात युवकांनी कायद्याची पायमल्ली करणारी घटना उघडकीस आली आहे. चतुर्मुख देवस्थानच्या परिसरात दोन युवक गाडीच्या बोनेट वर बसुन चित्तथरारक रीत्या गाडी चालवत होते. मात्र या आतिउत्साही युवक आणि त्यांच्या सोबत असलेल्या मित्रांना चक्क कायद्याच्या धाकाचा विसर पडला आहे. धोकादायक रीतीने प्रवास करणं हा कायद्याने गुन्हा आहे.
लॉकडाऊन शिथील होत असतानाच अतिउत्साही लोक आता पर्यटनाला घराबाहेर पडत आहेत. कोरोनाचे सर्व नियम अगदी पादळी तुडवण्यात धन्यता मानताना दिसत आहेत. रविवार व स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पुरंदर तालुक्यातील पर्यटनाच्या प्रत्येक स्थळावर गर्दी दिसून आली. दिवे घाट, बापदेव घाट, कापुरहोळ नारायणपूर घाट, गराडे खेडशिवापूर घाट, वीर धरण या सर्व परिसरात तालुका सह शेजारच्या तालुक्यातील लोक चारचाकी वाहनाने येत होते. गाडितील एकाही व्यक्तीच्या तोंडावर मास्क दिसून आले नाहीत. त्या भर म्हणून काही युवक दुचाकी दामटत फटा फट मोठे आवज काढत होते. तर या दोन अतिउत्साही युवकांनी तर कळस केला दोघंनी चक्क चारचाकीच्या दर्शनी भाग असलेल्या बोनटवर बसुन प्रवास करत व्हिडीओ व्हायरल हि केल, जणू काही रस्ता सुरक्षा कायदा हा न पाळण्यासाठीच असतो अशा आविर्भात हे युवक दिसून आले. आता पुरंदरच्या पोलिस यंत्रने पुढे आव्हान आहे, की अशा आगाऊपणाला आळा घालण्याचे व कायद्याचा धाक दाखवण्याचा.