सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय, सोमेश्वरनगर येथील वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी बँकिंग परीक्षा तयारी (Banking Exam Preparation) या विषयावर ऑनलाइन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घ्घाटन महाविद्यालयाचे सचिव प्रा. जयवंतराव घोरपडे यांनी केले याप्रसंगी कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य जवाहर चौधरी सर उपस्थित होते. उदघाटन प्रसंगी महाविद्यालयाचे सचिव प्रा. जयवंतराव घोरपडे सर यांनी बँकिंग परीक्षा कार्यशाळेचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी सध्याच्या परिस्थितीमध्ये बँकेसारख्या परीक्षांचे महत्त्व अधिक आहे असेही सांगितले तसेच वाणिज्य शाखेतील विद्यार्थी आणि बँक यांचा एक वेगळं नातं या विषयावर विशद विषद केली, आणि अशा कार्यशाळा आयोजित करण्यामागे महाविद्यालयाची भूमिका ही नेहमीच सकारात्मक असते असेही सांगितले.
या कार्यशाळेमध्ये प्रमुख वक्ते मा. दीपक धनवडे पाटील, पुणे यांनी बँकेमधील नोकरीच्या विविध पदावरील संधी, परीक्षा पद्धती, परीक्षेचे स्वरूप, परीक्षांचा अभ्यासक्रम आणि आवश्यक तो संदर्भ ग्रंथ याविषयी सविस्तर आणि अतिशय मौलिक असे मार्गदर्शन केले. तसेच IQAC समन्वयक डॉ. संजू जाधव यांनी कार्यशाळा कशी उपयुक्त आहे, त्याचप्रमाणे हे महाविद्यालय विद्यार्थी केंद्रित आहे आणि सर्व उपक्रम हे विद्यार्थ्यांना समोर ठेवूनच केले जातात असे सांगितले.
अध्यक्षीय भाषणामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य जवाहर चौधरी सर यांनी विद्यार्थ्यांना बँक ग्राहकांना कोणकोणत्या प्रकारच्या सेवा पुरवते आणि त्या सेवांच्या अनुषंगाने बँकेमध्ये रोजगार निर्मिती कशी होते याची माहिती देऊन युवकांनी बँकिंग क्षेत्रात पदार्पण करावे असे सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा कशी उपयुक्त आहे असेही सांगितले. या कार्यक्रमाचे संयोजन व प्रास्ताविक प्रा. प्रवीण जाधव यांनी केले त्यांनी या कार्यशाळेच्या संयोजनामागची रूपरेषा भूमिका आणि उद्देश स्पष्ट केला शेवटी आभार प्रदर्शन वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉ. राहुल खरात यांनी केले या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे सहसचिव सतीश लकडे, उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे, उपप्राचार्य डॉ. प्रवीण ताटे देशमुख उपप्राचार्य डॉ.कदम मॅडम उपप्राचार्य रजनीकांत गायकवाड तसेच उपप्राचार्य जगताप मॅडम, त्याचप्रमाणे महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने या कार्यशाळेसाठी उपस्थित होते