सोमेश्वर रिपोर्टर टीम------
जुबिलंट भारतीया फाऊंडेशन तर्फे आदर्श महिला उद्योजिका पुरस्कार सोहळा 2021-2022 आणि पर्यावरण सखी कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ राधाकृष्ण मंगल कार्यालय येथे नुकताच पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन अॅग्रीकल्चर ट्रस्ट,शारदानगर,बारामतीच्या विश्वस्त सुनंदाताई राजेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी जुबिलंट इंग्रेव्हिआ लि.चे उपाध्यक्ष सतिश भट व निरा-शिवतक्रार ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.तेजश्री काकडे, जुबिलंट इंग्रेव्हिआ लि.प्रॉडक्शन प्रमुख एस.भट,एचआर विभागाचे प्रमुख दीपक सोनटक्के, कमर्शियल विभाग प्रमुख निशिकांत नातू,क्वालिटी विभाग प्रमुख प्रतिक पटेल,जनसंपर्क व्यवस्थापक इसाक मुजावर,प्रॉडक्शन इनचार्ज संजय अडिसरे,ईपीपी चे प्रमुख विनोद होंगीकर,सुरक्षा अधिकारी सतेंदर, जुबिलंट भारतीय फाऊंडेशनचे अजय ढगे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला नीरा निंबूत व आसपासच्या गावातील बचत गटांच्या महिला उपस्थित होत्या.या कार्यक्रमाला गोकुळ स्वयं:सहायता महिला बचत गट,मु.पो.निंबुत,ता.बारामती यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकिता गवासणे यांनी केले.
सदरील कार्यक्रमात पर्यावरण सखी कार्यक्रमाचे उद्घाटन सुनंदाताई राजेंद्र पवार, सतिश भट आणि सौ.तेजश्री काकडे यांच्या शुभहस्ते करणयात आलेे.उद्घाटप्रसंगी विविध बचत गटांतील महिलांना लिंबाची रोपे देण्यात आली.या कार्यक्रमात सुनंदाताई पवार यांनी महिलांना सक्षमीकरणासाठी व पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून झाडे लावा मोहिम राबविण्याचे मार्गदर्शन केले.झाडे लावा व प्लास्टिकचा वापर टाळा असे आवाहन केले तसेच या कार्यक्रमात महिलांच्या सक्षमीकरणाबाबत बोलताना सतीश भट म्हणाले की,प्रत्येक बचत गटाला जुबिलंट भारतीया फाऊंडेशन प्रति बचत गट 300 लिंबाची रोपे देण्यात आली आहेत.अशा उपक्रमांमुळे भविष्यात व्यवसायाद्वारे महिलांना सक्षम व आत्मनिर्भर होण्यास मदत होईल.
आदर्श महिला पुरस्कार प्राप्त केलेल्या महिलांनी जुबिलंट भारतीया फाऊंडेशनमध्ये पापड,लोणचे बनवणे,केक तयार करणे,ब्युटी पार्लर इत्यादींचे प्रशिक्षण घेऊन स्वत:ला आत्मनिर्भर बनवून आपला व्यवसाय सुरू केला आहे.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दीपक सोनटक्के यांनी केले.