सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
धालेवाडी ता. पुरंदर या गावाने ग्रामपंचायत च्या माध्यमातून व सारथी युवा फाउंडेशन च्या मदतीने एक अनोखा उपक्रम राबवला आहे.संपूर्ण गाव या उपक्रमात उस्फुर्त सहभागी झाले आहे. उपक्रम आहे मरणोत्तर अवयव दान करण्याचा.
धालेवाडी गावचे सरपंच शरद काळाणे व चेअरमन हनुमंत (बाळासाहेब ) काळाणे यांनी पुढाकार घेऊन ग्रामपंचायत व युवा सारथी फाउंडेशन च्या मदतीने काही दिवसापूर्वी ग्रामस्थांना आव्हान केले की प्रत्येक कुटुंबातून किमान एक व्यक्ती अवयव दान करेल आणि या आव्हानाला प्रतिसाद देत 90% धालेवाडी ग्रामस्थांनी प्रतिसाद देत सहभाग नोंदवला आहे आणि लवकरच 100% अवयव दान करणारे पहिले गाव धालेवाडी असेल असा निर्धार यावेळी हनुमंत काळाणे यांनी व्यक्त केला आहे. अवयव दान हे सर्व श्रेष्ठ दान आहे. आपल्या मृत्यू पच्छात अवयव इतरांना कामी येवू शकतात त्यामुळे आम्ही या उपक्रमात सहभागी झालो असल्याचे यावेळी मुरलीधर काळाणे यांनी सांगितले.
या उपक्रमासाठी सारथी युवा फाउंडेशन चे अनिल खोपडे देशमुख,अमोल दरेकर,अनुजा हनुमंत शिंदे,तनुजा रामदास ढमाळ,सारिका खोपडे, दिप ढमाळ धालेवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच रोहिदास गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर भालेराव, सदस्या वंदना काळाणे,शशिकला साबळे,लक्ष्मीबाई कदम,अंकिता काळाणे हे मेहनत घेत आहेत.सदर उपक्रम राबवावा याचा प्रस्ताव वंदना काळाणे यांनी मांडला होता.पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी या उपक्रमाबद्दल धालेवाडी चे कौतुक केले आहे.
हनुमंत (बाळासाहेब) काळाणे
आदर्श गाव धालेवाडी आता देशासमोर एक नवा आदर्श निर्माण करत आहे. आम्ही केलेल्या मरणोत्तर अवयव दान आव्हानाला आमच्या गावातील सर्व नागरिकांनी उत्तम असा प्रतिसाद देत संपूर्ण गाव अवयव दान करणार देशातील पहिले गाव धालेवाडी ठरेल असा आमचा विश्वास आहे. इतर गावांनी देखील असा उपक्रम राबवावा.
संजय जगताप (आमदार पुरंदर हवेली )
अवयव दान हे काळाची गरज आहे, धालेवाडी ग्रामपंचायत व युवा सारथी फाउंडेशन ने हा एक आदर्श उपक्रम राबवला आहे त्यांच मी अभिनंदन करतो. या प्रकारचे उपक्रम सर्वांनी राबवणे गरजेचे आहे.