सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
कोणताही व्यवसाय हा प्रामाणिकपणे होणे गरजेचे आहे. टाटांचे एक सूत्र होते, मालाची गुणवत्ता, ग्राहक देवोभव आणि व्यवसायाचा धंदा होता कामा नये. या तीन सूत्रांनी चालला तर व्यवसायात निश्चित यश मिळणार असे सांगत व्यवसायातील नित्तीमत्ता संपवून देऊ नका नाहीतर त्याचा धंदा झाल्याशिवाय राहणार नसल्याचे मत माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी व्यक्त केले.
बारामती येथे बारामती ट्रेडर्स या नवीन दुकानाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रशेखर दैठणकार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, सोमेश्वर चे संचालक लालासाहेब माळशिकारे, सुनील भगत, किशोर भोसले, सचिन खलाटे, लालासाहेब नलवडे, माळेगाव चे माजी संचालक अशोक सस्ते, माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगुभाई शेख, उद्योजक अब्दूलगफार शेख, adv. सरफराज शेख, जेष्ठ पत्रकार दत्ता माळशिकारे, पत्रकार महेश जगताप, अमर मानकावले, महेश गायकवाड, अजिंक्य यादव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात विश्वास देवकाते, पुरुषोत्तम जगताप व चंद्रशेखर दैठणकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.