रविराज तावरे गोळीबार प्रकरण : माळेगावचे माजी सरपंच जयदीप तावरे यांना मोक्का न्यायालयाचा दिलासा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

माळेगाव चे माजी सरपंच जयदीप दिलीपराव तावरे यांना मोक्का न्यायालयाने मोठा दिलासा दिला असून त्यांना कोर्टात हजर होण्यासाठी चार आठवड्याकरिता मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्या सामार्थाकांमध्ये पुन्हा एकदा आनंदाचे भरते आले आहे. आज मोका कोर्टात हजर राहण्याचे आदेश असल्यामुळे  गावात सर्वत्र चर्च्या  रंगल्या होत्या. आज काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र माजी सरपंच जयदीप दिलीपराव तावरे यांना कोर्टाने दिलासा दिल्याने सामार्थाकांनी काही काळ का होईना सुटकेचा श्वास सोडला आहे.

      राष्ट्रवादीचे युवा नेते रविराज तावरे गोळीबार प्रकरणी मोक्कांतर्गत जामिनावर असलेले राष्ट्रवादीचे माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे यांना अटक करून हजर करण्याचे आदेश मोक्का न्यायालयाने दिले होते मात्र जयदीप तावरे यांच्या वकिलांनी ठोस पणे बाजू मांडल्याने न्यायालयाने तावरे यांना हजर राहण्यास पुढील चार आठववड्याची मुदत दिली आहे. या संदर्भात जयदीप तावरे यांच्या बाजूने अॅड.हर्षद निंबाळकर,  अॅड.सत्यम निंबाळकर,  अॅड.धैर्यशील जगताप यांनी बाजू मांडली.
To Top