पुरंदर ! यापुढे खांबांवर केबल टाकल्यास होणार गुन्हे दाखल होणार : पंकज धिवार यांच्या आंदोलनानंतर वीज वितरणाची कारवाई सुरु

Admin
पुरंदर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

पुरंदर तालुक्यातील सासवड येथे वीज वितरणच्या खांबावर बेकायदेशीर पणे टाकलेल्या ऑप्टिकल फायबर केबल काढून टाकण्याच्या व वीज बिले वेळेवर लोकांना ना देणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी तसेच या केबल चालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी आर. पी. आयचे पुरंदर तालुका अध्यक्ष पंकज धिवार यांनी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना पासून सासवडच्या वीज वितरणाच्या कार्यालय समोर उपोषण सुरू केले होते. गेली चार दिवस चाललेल्या उपोषणानानंतर आज हे उपोषण स्थगित करण्यात आले आहे.
           काल बुधवारी सायंकाळी उशिरा वीज वितरण तर्फे सासवड येथील त्यांच्याच कार्यालया समोरील केबल कट करण्यास सुरवात केली. त्याच बरोबर यापुढे कोणी अशा प्रकारे केबल टाकण्यासाठी वीज वितरणाच्या खांबाचा वापर केल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे लेखी आश्वासन दिले आहेत. त्याच बरोबर येत्या १५ दिवसांत तालुक्यातील सर्व ठिकाणच्या केबल काढून टाकल्या जातील असा वीज वितरणाच्यावतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे पंकज धिवार यांनी आज रात्री साडेनऊ वाजता हे उपोषण तत्पूर्ते  स्थगित केले आहे.

पंकज धिवार :-  गेली चार दिवस ऊन, वारा, पाऊस झेलत अमरण उपोषण करत अतिक्रमणा विरोधात आंदोलन केले. आज बुधवारी विज वितरणच्या कार्यालयासमोरील खांबावरील केबल विज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी काढण्यास सुरवात केली, तर संध्याकाळी उशीरा यापुढे एम.एष.इ.बी.च्या खांबावर कोणी ऑप्टिल किंवा केबल टाकल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे लेखी आश्वासन विज वितरणच्या अधिकाऱ्यांनी दिल्याने अमरण उपोषण त तपुर्ते स्थगिती करत आहे, पण पुढे कारवाई न झाल्यास पुन्हा कार्यकर्त्यां सोबत तिव्र स्वरुपाचे केले जाईल.
To Top