सोमेश्वर रिपोर्टर टीम-- ---
बारामती तालुक्यातील वाणेवाडी ते मळशी या सव्वा किलोमीटर लांबीच्या डांबरीकरण रस्त्याचे भूमिपूजन पार पडले.
बारामती तालुक्यातील अनेक विकास कामे युद्धपातळीवर सुरू असताना मात्र वाणेवाडी ते मळशी रस्ता गेल्या अनेक वर्षापासून रखडला होता. मात्र आज या रस्त्याचे भूमीपूजन पार पडले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून दीड कोटी रुपये खर्चाचा हा रस्ता असून सव्वा दोन किलोमीटरचा असून सहा मीटर रुंदी असणार आहे. रस्त्याच्या भूमिपूजन समारंभाप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, सोमेश्वर कारखन्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, दूध संघाचे माजी अध्यक्ष पोपटराव भोसले, राष्ट्रवादी युवकचे माजी अध्यक्ष विक्रम भोसले, सोमेश्वरचे संचालक किशोर भोसले, कृष्णाई पतसंस्थेचे अध्यक्ष सुनील भोसले, युनियन चे अध्यक्ष दिग्विजय जगताप, शेतकरी संघटना सोमेश्वरनगर चे अध्यक्ष शहाजी जगताप, वाणेवाडीचे उपसरपंच संजय जगताप, संग्राम जगताप, सुशांत भोसले, ग्रामपंचायत चे सर्व सदस्य, ठेकेदार निलेश जगताप, प्रतीक जगताप व आदित्य जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.