डोर्लेवाडी ग्रामपंचायतीची थेट उपमुख्यमंत्र्यांकडे धाव 'त्या' महिला वैद्यकिय अधिकाऱ्यांची बदली करा : डोर्लेवाडी पत्रकार शिवीगाळ प्रकरण

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

डोर्लेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. वैशाली देवकाते यांच्या मनमानी कारभाराला वैतागलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे धाव घेतली आहे. 
         बारामती येथे उपमुख्यमंत्र्यांच्या दौºया दरम्यान ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी सबंधीत वैद्यकिय अधिकाºयाची बदली करावी असे निवेदन उपमुख्यमंत्री पवार यांना दिले आहे.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेल्या निवेदनानुसार, डोलेर्वाडी ( ता. बारामती ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामकाज संदर्भात गावातील ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. येथील वैद्यकिय अधिकाºयाच्या मनमानी कारभारामुळे दैनंदिन कामाकाजामध्ये विस्कळीत पणा आलेला आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये याठिकाणी सामान्य गोरगरीब नागरिक जात असतात परंतु नागरिकांना या ठिकाणी योग्य वागणूक दिली जात नाही. सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत असणारी डोलेर्वाडी, झारगडवाडी, सोनगाव, गुणवडी, मळद ही गावे कोरोना हॉटस्पॉट झाली आहेत. मात्र तरिही येथे लसीकरणामध्ये वशीलेबाजीमुळे सावळा गोंधळ उडाला आहे. विशेष म्हणजे येथील वैद्यकिय अधिकारी डॉ. वैशाली देवकाते यांचे पती डॉ. बापूराव दडस देखील या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.  प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत गावातील नागरीकांना लस न देता बाहेरील गावातील व कंपनीतील लोकांना  पैसे घेऊन लस देत असल्याच्या तक्रारी येत आहेत. गावातली लसीकरण कमी झाल्यामुळे कोविड रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. हे वैद्यकिय अधिकारी स्टापला देखील दुय्यम दर्जाची वागणूक देत आहेत. ‘आमचं कोणीही काहीही करू शकत नाही.आमची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सीओ साहेब यांच्याकडे तक्रार करा’ असे ते वारंवार म्हणत असतात. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गेली १०-१२ वर्षांपासून अधिककाळ वैद्यकिय अधिकारी म्हणून हे पती-पत्नी कार्यरत आहेत. त्यांची बदली करण्या बाबत ०५ आॅक्टोबर २०१८ च्या ग्रामसभेमध्ये ठराव देखील करण्यात आलेला आहे. वारंवार पत्रव्यवहार करून देखील या दाम्पत्याची बदली होत नाही, अशी तक्रार या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी सरपंच पाडुरंग सलवदे, सदस्य रामभाऊ कालगावकर, शहाजी दळवी, दिगंबर भोपळे आदी प्रमुख ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते. 
-----------------------------------
To Top