किमान दोन मुलांवर तरी थांबा : उपमुख्यमंत्री अजित पवार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दीपक जाधव

 बारामती तालुक्यातील वढाणे येथील गावठाण तलावात सोडण्यात आलेल्या जनाई योजनेच्या पाण्याचे जलपुजन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. 
    सुपे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोल पंपाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. 
       रसिकलाल धारिवाल फाउंडेशन आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्या माध्यमातून वढाणे येथील गावठाण तलावात बंद पाईपलाईनद्वारे आणलेल्या जनाईच्या पाण्याचे जलपुजन पवार यांनी केले. 
       याप्रसंगी रसिकलाल माणिकचंद धारिवाल फाउंडेशनच्या उपाध्यक्षा शोभा धारिवाल, जनाई योजनेचे अधिक्षक अभियंता संजय चोपडे, पाठबंधारे विभागाचे अधिकारी, सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, संभाजी होळकर, जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, प्रांतधिकारी दादासाहेब कांबळे आदींसह परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य, सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 
      बारामती तालुकाचा भाग हा अवर्षण प्रवर्षण क्षेत्रात येत असल्याने पावसाचे प्रमाण कमी असते.  जनाईचे पाणी वढाणे तलावात सोडण्याची गेली अनेक दिवसाची मागणी होती. त्यामुळे रसिकलाल धारिवाल फाउंडेशन या संस्थेला बंद पाईपद्वारे वढाणे तलावात पाणी आणण्याबाबत चर्चा केली. त्यानुसार या फाउंडेशनच्या उपाध्यक्षा शोभा धारिवाल यांनी ४० लाख तर कृष्णा खोरे विकास महामंडळाकडुन २५ लाख मिळुन ६५ लाख खर्चाची ८०० मिटर लांबीची बंद पाईपलाईन वढाणे तलावापर्यंत करण्यात आली. 
      या पाईपलाईनद्वारे आलेल्या पाण्याचे जलपुजन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र हे पाणी फुकट न वापरता विजेचे बील भरण्यात यावे असे पवार यांनी सांगितले. यावेळी सुप्यासह तालुक्यात होणाऱ्या प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी सुमारे ३५० कोटीचा निधी उपलब्द होणार आहे. त्यामुळे यापुढे महिला पाण्यासाठी डोक्यावर हंडा घेवुन दिसणार नाहीत असे पवार यांनी सांगितले. 
     सुप्यासह तालुक्यात विविध विकास कामे राबविली जात आहेत. सुप्याचा आराखडा तयार करण्यात आला असुन यापुढे नागरिकांना मनमानी बांधकामे करता येणार नाहीत असे पवार यांनी सांगितले. 
      यावेळी वढाणे तलावापर्यंत पाईपलाईन टाकण्यासाठी ज्या व्यक्तिंच्या जमिनी गेल्या तसेच पाईप उतरवण्यासाठी सहकार्य केले आदी मान्यवरांचा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक माजी जि. प. सदस्य ज्ञानेश्वर कौले यांनी केले. 
   ------------------------ 
माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी मागिल पन्नास वर्षापासून कुटुब नियोजनाचा धडा घालुन दिला आहे. मात्र मी एक कुटुंब एक मुल म्हणणार नाही. पण किमाण दोन मुलांवर तरी थांबले पाहिजे असे उपमुख्यमंत्री यांनी सांगितले. 
To Top