खंडाळा l रूई येथील दोन बेपत्ता मुलांपैकी एकाचा मृतदेह निरा उजव्या कालव्यात सापडला : मुलीचा शोध अद्याप सुरूच

Admin
2 minute read
लोणंद प्रतिनिधी 
अंदोरी ता खंडाळा गावच्या हद्दीमध्ये असणाऱ्या रुई येथील प्रशांत रामचंद्र राणे यांचा ४ वर्षाचा मुलगा व अडीच वर्षाची मुलगी ही बहीण भाऊ असणारी लहान मुले शनिवारी सकाळ १२ वाजल्यापासुन बेपत्ता झाली होती या घटनेची नोंद लोणंद पोलीस स्टेशनला करण्यात आल्यानंतर लोणंद पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन या दोन्ही मुलांचा शोध घेतल्यावर आज सकाळी पाडेगाव हद्दीतील तुकाईनगर परिसरात निरा उजव्या कालव्यात पाण्यात आशिष प्रशांत राणे या चार वर्षाच्या चिमुकल्याचे शव आढळून आले. तर ऐश्वर्या या अडीच वर्षाच्या मुलीचा शोध पोलिसांकडून अजून सुरू आहे. पोलिसांनी सदर शव स्थानिक तरुणांच्या मदतीने पाण्याबाहेर काढून पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.
To Top