सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
पुरंदर : प्रतिनिधी
नीरा येथील रंगभुषाकार अमर झेंडे यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा झी युवा रंगभुषाकार सन्मान २०२१-२२ जाहिर झाला आहे. अमर झेंडे हे नीरा एस्टी बस स्थानकासमोर पेट्रोल पंपाच्या शेजारी शुभयोग हेअर ड्रेसेस मधून लोकांना सेव देत आहेत. झेंडे यांना झी युवा रंगभुषाकार पुरस्कार जाहिर झाल्याने नीरेच्या शिरपेचात अणखी एक तुरा मिळाल्याचा आनंद येथील युवकांनी व्यक्त केला.
अमर झेंडे गेली दहा वर्षे नीरेत आपल्या नातेवाईक सुधीर गायकवाड यांच्या शुभयोग हेअर ड्रेसेस मध्ये सेवा करत आहेत. याच दरम्यान त्यांना चित्रपट सृष्टीत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. झेंडे यांनी राजा शिव-छत्रपती, स्वराज्य रक्षक संभाजी, स्वराज्य जननी जिजामाता, तानाजी फिल्म, पानीपत, सर सेनापती हंबीरराव या मालिकांमधून आणि जानता राजा व शिवपुत्र संभाजी या दोन महानाट्याच्या माध्यमातून झेंडे यांनी ऐतिहासिक रंगभुमीचा वारसा रंगभुषाकारीच्या माध्यमातून सेवा केली. या कार्याची दखल घेत झी युवा वाहिनी तर्फे होऊ घातलेल्या कार्यक्रमात झेंडे यांना झी युवा रंगभुषाकार सन्मान २०२१-२२ देण्याचे नियोज केले असल्याचे पत्र प्राप्त झाले आहे.
अमर झेंडे मितभाषी व्यक्तीमत्व आहे. झेंडे मुळचे बोरगाव ता. वाळवा, जिल्हा सांगली येथील. परिस्थिती बेताची असल्याने नीरा येथी आपले नातेवाईक गायकवाड यांच्याकडे व्यावसायासाठी आले. पण त्यांच्यातील कलाकाराला हे काम करुन पुढे मोठे काहितरी करायची चुणूक दाखवायची होती. त्यामुळे ते सतत चित्रपट किंवा टिव्ही मालिकात काम कसे मिळेल यासाठी धडपडत असे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊन झाल्यानंतर त्यांनी नीरा पोलीसांची सेवा केली. यापुर्वीही त्यांच्या कार्याची दखल झी वाहानीने घेतली आहे. खा. अमोल कोल्हे यांचे ते खास मेकअपमन आहेत. झेंडे आपला व्यावसाय संभाळत महिलांना मेकपचे शिक्षण ही देत आहेत. परिसरातील विविध गावातील बचत गटांच्या माध्यमातून त्यांनी प्रशिक्षण दिले आहे. या प्रशिक्षणाने महिलांना रोजगार निर्माण झाला आहे. झेंडे यांना झी युवा रंगभुषाकार पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल महिला व युवकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.