सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
बारामती येथील विद्या प्रतिष्ठान येथील व्हीआयआयटी सभागृहात अजितदादा: माणूस जिवाभावाचा या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मोरे गेली बारा वर्षांपासून अजितदादा यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून लोकनायक ही स्मरणिका प्रकाशित करत असतात. यंदाच्या स्मरणिकेमध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, वनमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, सुनील तटकरे, श्रीनिवास पाटील, आमदार रोहित पवार, शिवेंद्रराजे भोसले यांनी अजित दादांविषयी आपल्या भावना शब्द रूपात व्यक्त केल्या आहेत.