मु.सा. काकडे महाविद्यालामध्ये 'आपत्ती व्यवस्थापन' या विषयावर कार्यशाळा संपन्न

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------

 मु.सा.काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर येथे गुरुवार  दि. 05. 08. 2021 रोजी भूगोल विभाग व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आय. क्यू. ए.सी.च्या मार्गदर्शनाखाली  'आपत्ती व्यवस्थापन' या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत विविध जिल्ह्यातून  250 पेक्षा अधिक शिक्षक व विद्यार्थी  सहभागी झाले होते. सदरच्या कार्यशाळेमध्ये ब्रिगेडियर डॉ. सुनील बोधे व डॉ. प्रमोद पाटील हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. ब्रिगेडियर डॉ. सुनील बोधे यांनी  'आपत्ती व्यवस्थापन : काळाची गरज' या विषयावर आपले विचार मांडले. गावपातळीपासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंत आपत्ती व्यवस्थापनाची  यंत्रणा कशी काम करते तसेच आपत्तीपासून स्वतःचा व इतरांचा बचाव कसा करावा यासंदर्भात मार्गदर्शन केले तर दुसरे व्याख्याते डॉ. प्रमोद पाटील यांनी 'अवकाशातील विजा व त्यापासून बचाव ' या विषयावर संशोधनपर अभ्यासपूर्ण मांडणी केली. विजांची निर्मिती कशी होते, विजां बद्दल समाजात असलेला गैरसमज व  विजांपासून स्वतःचे रक्षण कसे करावे या संदर्भात आपले विचार मांडले. सदरच्या कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य जवाहर चौधरी यांनी केले. या कार्यशाळेमध्ये संस्थेचे सचिव श्री. जयवंत घोरपडे, श्री. सतीश लकडे, उपप्राचार्य डॉ. प्रविण ताटे- देशमुख, डॉ.जे. एम.साळवे, डॉ. जया कदम व सर्व प्राध्यापक उपस्थित होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक एन.सी.सी प्रमुख लेफ्टनंट डॉ. एस.टी.घाडगे यांनी केले, तर डाॅ. एस.पी.जाधव यांनी अाभार मानले.सदरची कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी प्रा. वाघमारे के.सी., प्रा.आर.डी. गायकवाड यांनी मेहनत घेतली.
To Top