नावाला शोभेल अशी 'समाजसेवा' व्हाट्सअप ग्रुपची समाजसेवा : कोरोना आणि पूरग्रस्तांनासाठी जमा केले तब्बल सव्वा दोन लाख

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----

काही व्हाट्सअप ग्रुप फक्त नावाला काढले जातात मात्र बारामती तालुक्यातील निंबुत येथील समाजसेवा व्हाट्सअप ग्रुप ने नावाला शोभेल अशी समाजसेवा करत जिल्ह्यात आदर्श निर्माण केला आहे. 
         समाजसेवा ग्रुप अडमीन मदन काकडे यांनी  दि.१८/७/२०१४ रोजी २५६ सदस्यांनी एकत्र येवुन तयार केला असुन ग्रुप मध्ये विविध
क्षेत्रातील, विविध पक्षाचे, विचारांचे सदस्य असुन सामाजिक कार्यात ग्रुपचा कायम सक्रिय सहभाग असतो.
मध्यंतरी समाजसेवा ग्रुपने कोव्हीड काळात बारामती, पुरंदर, खंडाळा व फलटण तालुक्यातील ११ कोव्हीड
सेंटरला १,११,000/- रूपयांचे आर्थिक मदत केली आहे.
आज कोल्हापुर, सांगली व सातारा भागात महापुराचे महासंकट उभे राहिल्याने ग्रुपच्या सदस्यांनी
१,१७,७७१/- रू. मदत निधी जमा केला आहे. कागल जिल्हा कोल्हापुर येथील खडकेवाडा व गलगले
पुरग्रस्त भागात ९०० रूपये किंमतीचे २८ किराणा किट देण्यात आले. यासाठी २५,000/- रू. मदत निधी
देण्यात आला. यासाठी.संतोष शेंडकर,.योगेश यादव सोळस्कर, डॉ राहुल खरात,  मदन काकडे व  राजकुमार बनसोडे यांनी नियोजन केले. तर सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात जुने खेड गावामध्ये २५,000/- रू. पर्यंतचे साहित्य वाटप करण्यात आले यासाठी  राहुल जगताप,  संग्राम जगताप,  प्रसाद सोनवणे,  धैर्यशिल काकडे व योगिराज काकडे यांनी नियोजन केले. तर पाटण तालुक्यात सातारा जिल्ह्यामध्ये मरळी ग्रा.पं तर्फे आंबेघर गावासाठी ५०,000/- रू. मदत निधीचा चेक मा.ना.शंभुरोजे
देसाई (गृहराज्य मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांना राहुल काकडे,  प्रियराज काकडे,  अमरदिप काकडे, डॉ सौरभ काकडे यांचे हस्ते सुपुर्द करण्यात आला. सदस्यांचे मदत करण्याचे काम सुरू असुन १७.७७१/रू. निधी शिल्लक आहे तो महाड कोकण भागात मदत करण्याचे ग्रुपने उदिष्ट ठेवले असुन यासाठी  संतोष सोरटे, अंकुशराव जगताप, पी.एल.दादा निगडे व  परवेश मुलाणी नियोजन करीत आहेत. या सामाजिक कार्यात सर्व सदस्य एक जिवाने काम करीत असुन भविष्यात समाजसेवा ग्रुप समाजकार्यात कायम अग्रेसर असेल ग्रुपच्या या कार्यामुळे नविन आदर्श निर्माण झाला आहे. जेष्ठ पत्रकार दत्ता माळशिकारे, 
अजय कदम,  राहुल काकडे,  अभिजित काकडे, अॅड. गणेशजी आळंदीकर,  दिलीप खैरे, गौतम काकडे,  राजेंद्र गलांडे,  टी.के.जगताप,  महेश जगताप,  हेमंत घाडगे कुमारभाऊ जगताप,  युवराज खोमणे, राहुल शिंदे, हेमंत गडकरी,  राजेंद्र निंबाळकर यांचे मार्गदर्शन मिळत आहे.
-----------------------------
समाजसेवा ग्रुपच्या कायदेशिर सल्लागार पदी ॲड.श्री गणेशजी आळंदिकर साहेब यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यांचे पत्रकार क्षेत्रातील योगदान, न्यायपालिकेतील उत्कृष्ट कामकाज, त्यांचे प्रकाशित झालेले कायद्याचे पुस्तक तसेच माजी सैनिक संघटनेमध्ये असलेले उल्लेखनिय कार्य, सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट मध्ये शासनाने केलेली नियुक्ती, शासनाच्या वतीने नोटरी पदी नियुक्ती, तसेच त्यांचा समाजकार्यात असणारा दांडगा अनुभव अशा विविध कारणास्तव त्यांची आपल्या समाजसेवा ग्रुपवर कायदेशिर सल्लागार म्हणुन निवड करण्यात
आलेली आहे.
----------------------
To Top